ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: दीर अन् सासूच निघाले ‘व्हिलन’; आधी पतीचं निधन, आता शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, पुण… ✦ ⚡ रेल्वेत सावज हेरायची, प्रसाद म्हणून चिक्की द्यायची अन्… महिलेचं कांड पाहून सगळ्यांना धक्का, सोलापुरात मोठ… ✦ ⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि…
SP News Maregaon

साताऱ्यातून चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’:17 जणांवर पोलिसांची कारवाई; बोगस कॉल सेंटर उध्वस्त

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अमेरिकन नागरिकांचा डेटा समाविष्ट आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी” या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून हे कॉल सेंटर सुरू होते. नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या छाप्यात कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य, अमेरिकन नागरिकांचे संपर्क तपशील आणि २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. या प्रकरणात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह विरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दिपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चार महिलांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. प्राथमिक तपासात आरोपी अमेरिकन नागरिकांना फोन करून “तुमच्या नावाने अॅमेझॉनवरून खरेदी झाली आहे” असे सांगत होते. संबंधित व्यक्तीने व्यवहार नाकारल्यास बनावट ऑर्डर क्रमांक व मेसेज पाठवून विश्वास निर्माण केला जात होता. त्यानंतर “ऑर्डर रद्द करण्यासाठी गिफ्ट कार्ड खरेदी करा” किंवा “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत पैसे उकळले जात होते. फसवणुकीसाठी प्रामुख्याने डॉलर व्यवहारांचा वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अमेरिकन तपास यंत्रणांशी समन्वयाची शक्यता या सायबर फसवणुकीचे धागेदोरे परदेशाशी संबंधित असल्याने सातारा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांची मदत घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. “डिजिटल अरेस्ट”, बनावट ई-कॉमर्स व्यवहार आणि गिफ्ट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आरोपींची नावे वरील आरोपींना दिनांक २५ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर