ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खंडोबारायांच्या सासुरवाडीत ‘अधिकमास’ सोहळा:16 जावयांच्या हस्ते धोंडे पूजन; जागरण-गोंधळ अन् पारंपारिक गीतांनी वातावरण भक्तिमय

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे अधिक मासानिमित्त एक आगळावेगळा धार्मिक उपक्रम पार पडला. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिरात आयोजित धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच नेवासा बुद्रुक तीर्थक्षेत्रातील उपस्थित १६ जावयांचा विशेष सत्कार करून त्यांच्या हस्ते धोंड्याची पूजा करण्यात आली. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजी ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे निमंत्रण थेट जेजुरी येथे जाऊन खंडेरायांना अर्पण करण्यात आले होते. तसेच मालेगाव (चंदनपुरी) येथील बाणाई देवस्थानालाही निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी संभाजी ठाणगे, संगीताताई ठाणगे, राजेंद्र काशीद व आशाताई काशीद यांच्या हस्ते खंडोबारायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा भोग अर्पण करण्यात आला. खंडेरायांना धोतर, शर्ट, टोपी तर म्हाळसादेवी व बाणाई मातेला साडी-चोळी अर्पण करून भक्तिभावाने पूजा करण्यात आली. कार्यक्रमात खरवंडी येथील वाघे सचिन शिंदे व त्यांच्या जागरण-गोंधळ पथकाने खंडेरायांची पारंपरिक गीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. खंडोबा भक्त व लेखक मार्तंड वाळके यांनी म्हाळसा-खंडोबाचा महिमा कथन करत उपस्थितांना धार्मिक परंपरांचे महत्त्व सांगितले. यावेळी कोंडीराम महाराज पेचे, बदाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनुभुले, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, नेवासे प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, उद्योजक बाळासाहेब मारकळी, अनिल हापसे, राजेंद्र काशीद, बाळू फसले, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, प्रकाश उंडे, रविंद्र मुसमाडे, रविंद्र उसारे, सोमनाथ मरगळ, शांताराम बोर्डे, प्रकाश गुंडे, भजन जाधव, भास्कर कणगरे, अॅड. ब्राम्हणे, संदीप आलवणे, शंकर महाजन व गोरख शेंडे यांच्या हस्ते तळीभंडार व महाआरती करण्यात आली. धोंड्याच्या कार्यक्रमानिमित्त इंदोर येथील खंडोबा भक्त मुक्ताजी काटे व सुशीलाबाई मुक्ताजी काटे यांनी मंदिरास भेट दिली. मंदिराच्या जीर्णोद्धार व अन्नदान कार्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यावतीने मंदिर जीर्णोद्धार समितीच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना धोंड्याच्या निमित्ताने मिष्टान्न भोजनाचा प्रसाद देण्यात आला. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर