ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सख्ख्या भावानेच केला भावाचा घात

10 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

देवाळा येथे भावावर फावड्याने हल्ला; एक गंभीर जखमी

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे सख्ख्या भावाने मोठ्या भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनिल बाबाराव बावने (वय 30, रा. देवाळा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना 23 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास देवाळा येथील राहत्या घरी घडली.आरोपी सुनिल बावने याने त्याचा मोठा भाऊ अनिल बाबाराव बावने (वय 35) याच्यावर फावड्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर अनिल बावने हा घरातील हॉलमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर