ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती करण्यात आली. जिल्हा ब्राह्मण सेवा संघ संचलित महर्षी वेद विद्यालयाच्या वतीने आयोजित या वैदिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला होता. वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात भक्तिरसाचा दरवळ निर्माण केला होता. या भव्य उपक्रमाला अहिल्यानगरमधील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अहिल्यानगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे उपाध्यक्ष राजकुमार जोशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली. यजमान प्रसाद कडेकर व अशोक कुलकर्णी यांनी सपत्नीक अग्नी प्रदीपन करून यागाचा प्रारंभ केला. यानंतर प्रायश्चित्त विधी, श्रीगणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, योगिनी मंडल पूजन, वर्धिनी कलश पूजन, भैरव मंडल, रुद्र मंडल तसेच नवग्रह पूजन यांसारखे विविध वैदिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. यानंतर यजमान चंद्रचूड गोंगले, अशोक कुलकर्णी, राजेंद्र भणगे, अॅड. शिरीष गटणे, अनिलकुमार जोशी आणि निनाद देव यांच्या हस्ते ऋग्वेद हवन, स्थापित देवता हवन, बलिदान, पूर्णाहुती व महाआरती करण्यात आली. विशेष म्हणजे, दररोज पाच वेगवेगळ्या यजमानांच्या हस्ते ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयाग संपन्न होत होता. या सोहळ्याप्रसंगी संघाचे अध्यक्ष किशोर जोशी, मयूर जोशी, अमोल कापरे, प्रसाद कुलकर्णी, सागर गोवर्धन, अवधूत भणगे, श्रीकांत जोशी, ओम जोशी, गणेश भालेराव, प्रदीप जोशी घनपाठी, प्रतीक मुळे, आनंद जोशी उपस्थित होते. यागाच्या पूर्णाहुतीनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी राजकुमार जोशी यांनी अथक परिश्रम घेतले. राजकुमार जोशी परिवाराच्या वतीने दररोज अन्नदानाची सेवा करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर