ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

वादळी पावसामुळे घरांची पडझड, कांदा अन् फळबागांचे मोठे नुकसान:झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, आ. काळेंच्या प्रशासनाला सूचना‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वारा झाला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक गरिबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले असून, काढणीला आलेल्या फळबागा आणि साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला तातडीने आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डाळिंब बागांसह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी साठवणुकीसाठी ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या कांद्यावरील आच्छादने हवेत उडून गेल्याने कांदा भिजला असून, उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळाने मोठे नुकसान केले. त्यात खिर्डीगणेश येथे शब्बीर सांडू शेख यांच्या पोल्ट्रीचे शेड कोसळले. मढी बुद्रुकला सुनील बाबासाहेब चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाले व भिंती पडल्या. बहादरपूरात काही झाडे व फांद्या तुटल्या, दोन कच्च्या घरांचे पत्रे उडाले. तळेगावमळेत मंदा मंजहारी वैद्य यांच्या घरावर आणि कांदा चाळीवर मोठे झाड कोसळले. वेस: भगवान नाना माळी यांच्या घराचे पत्रे उडून घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही “बाधित शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तसेच, मतदारसंघातील एकही बाधित शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. पंचनामे करताना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर