ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

चांदूरबाजार येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध:काँग्रेसने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलींडरच्या सतत होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चांदूर बाजार तालुका शाखेच्यावतीने तीव्र घोषणाबाजी करित तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी व विद्यार्थीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. मे महिन्यात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरामध्ये चार वेळा वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर आणि नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यही धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्यावतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरूद्ध ऊर्फ बबलूभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विलासराव शेकार, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रताप किटुकले, निखिल काटोलकर, श्रेयस बर्वे, राजेंद्र बंड, मनोज देशमुख, विजय राऊत, भाई देशमुख, विनोदराव खवले, अंकुश देशमुख, भूषण देशमुख, अभिजीत सावरकर, गोपाल रडके, संविधान मोहोड, तेजस वानखडे, वासुदेव देशमुख, मंगेश देशमुख, राहुल वाटाणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर