ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नागपुरात गॅरेजला भीषण आग, 4 गाड्या जळून खाक:15 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगर परिसरात एका गॅरेजला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चार गाड्या जळून खाक झाल्या, ज्यात सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील सुमारे 50 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. आराधना नगर येथील सातपुडा बारच्या बाजूला असलेल्या ‘साहिल गॅरेज’मध्ये ही घटना घडली. गॅरेजचे मालक अनंत सुधाकर काळे यांच्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजण्यापूर्वी अचानक आग लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वाठोडा अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी चंद्रशेखर आर. रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली दोन अग्निशामक वाहने आणि लकडगंज अग्निशमन केंद्राचे एक वाहन अवघ्या दोन मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले.

या आगीत एमएच 47 वाय 9817 आणि एमएच 41 वाय 3646 या दोन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच, एमएच 31 एफसी 5005 ही गाडी अंशतः जळाली, तर एमएच 31 सीजी 9047 ही भंगार (स्क्रॅप) गाडीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाठोडा आणि लकडगंज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी संयुक्तरीत्या पाण्याचा मारा करून काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या या जलद कारवाईमुळे गॅरेजमधील व आसपासची तब्बल 50 लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षित राहिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर