ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ:काँग्रेसचे 60 हून अधिक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसतानाच, पूर्व विदर्भात अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. अधिकृत उमेदवारांची नावे निश्चित होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि महत्त्वाच्या नगरसेवकांचे फोन अचानक बंद झाले असून, ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एवढेच नव्हे तर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० हून अधिक नगरसेवक एकाच वेळी गायब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधान परिषदेची ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींमधून (जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक) होणार असल्याने, महापालिकेतील आणि नगरपंचायतींमधील प्रत्येक मताला मोल प्राप्त झाले आहे. अशातच भाजपने काँग्रेसला गाफील ठेवून पूर्व विदर्भात मोठी रणनीती आखल्याची माहिती मिळत आहे. लोकप्रतिनिधी आमदार बंटी भांगडियांच्या संपर्कात? हे सर्व लोकप्रतिनिधी भाजपचे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या थेट संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपने या सर्व नगरसेवकांना मत फुटू नये म्हणून तातडीने राज्याबाहेर किंवा अज्ञात स्थळी सुरक्षित हलवल्याचे बोलले जात आहे. केवळ सिंदेवाहीच नव्हे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० पेक्षा जास्त नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहेत. या मोठ्या खिंडारामुळे काँग्रेस छावणीत प्रचंड अस्वस्थता पसरली असून नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर होण्याआधीच तटबंदी; वडेट्टीवारांना मोठा धक्का राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवर कोण लढणार, याच्या प्राथमिक बैठका सुरू आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाने चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, प्रत्यक्ष रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच भाजपने मतदारांची तटबंदी करत विरोधी पक्षांची ताकद तोडण्यास सुरुवात केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या स्वतःच्या हक्काच्या बालेकिल्ल्यातच भाजपने ही मोठी गुप्त मोहीम फत्ते केल्यामुळे, हा वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाला आणि पर्यायाने काँग्रेसला लागलेला मोठा धक्का मानला जात आहे. ५ लाख रुपये देऊन नगरसेवकांना उचलले – वडेट्टीवार निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आमच्याही संपर्कात भाजपचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. भाजपच्या अंतर्गतही प्रचंड वाद आहेत. परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. माझ्या माहितीप्रमाणे ५-५ लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचे काम चाललेले आहे. या सवयी २०१४ पासून सर्वांनाच लावली आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. भविष्यात विधीमंडळात उद्योगपती दिसतील वडेट्टीवार म्हणाले, या घोडेबाजारात पैसा कोण गुंतवतो तर व्यापारी, व्यावसायिक, मोठमोठे उद्योजक पैसे गुंतवतात. राजकारण आणि समाजसेवा जी प्रामाणिक केली जाते, ती आता सर्व उद्योगपतींच्या हातात जाईल. त्यांना समाजाशी काही देणेघेणे असणार नाही. भविष्यात विधीमंडळ आणि विधानसभेत उद्योगपती, ठेकेदार, कंत्राटदार हे चेहरे दिसतील. सामान्य माणूस कुठेही दिसणार नाही, अशी परिस्थिती आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शिवानी वडेट्टीवार निवडणूक लढणार का? विधान परिषद निवडणुकीसाठी शिवानी वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत होते. त्या देखील मतदारसंघात फिरल्या असून, नगरसेवकांशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे त्या निवडणूक लढणार आहेत का? असे विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, अद्याप काही ठरलेले नाही. जोपर्यंत आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होत नाही, तोपर्यंत मी यासंदर्भात काही निर्णय घेणार नाही. एका मतासाठी १५ लाख रेट विजय वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे प्रचंड धनशक्ती आणि मोठमोठे उमेदवार आहेत. जो काही आता रेट खुलल्या गेला, तो १५ लाख रुपये उघडल्याचा दावा विजय वडेट्टवार यांनी केला. १५ लाख रुपये एका नगरसेवकाला दिल्यानंतर त्यांना वाटतं मोठा उत्सव, दिवाळी झालीये. ही १०० कोटींची निवडणूक आहे. १५-१५ लाख रुपये देऊन एका मतासाठी निवडणुका होत असतील, तर भविष्यात लोकशाही जिवंत राहील की नाही? हा खरा खरा प्रश्न निर्माण होतोय, असे ते म्हणाले. नगरसेवकांवर कारवाई होणार जे जे नगरसेवक नॉट रिचेबल झालेत, ते पक्षाचा व्हीप झुगारुन गेले आहेत. ते परत आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांचे सदस्यत्व रद्द होईल. ते आम्ही करू. त्यानंतर ते ६ वर्षांसाठी निवडणूक लढण्यास पात्र नसणार. आम्ही व्हीप जारी केल्यानंतर योग्य ती कारवाई होईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी नॉट रिचेबल नगरसेवकांना दिला आहे. विदर्भातील निवडणूक चुरशीसी होणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार आणि नगरसेवकांची पळवापळवी नवीन नसली, तरी थेट विरोधी पक्षनेत्यांच्याच घरात घुसून भाजपने खेळलेली ही ‘किंगमेकर’ खेळी सर्वांनाच चकित करणारी ठरली आहे. काँग्रेसचे गायब झालेले नगरसेवक आता थेट मतदानाच्या वेळीच समोर येणार की काँग्रेस डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार, यावर या जागेचे भवितव्य अवलंबून आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे पूर्व विदर्भातील विधान परिषदेची ही लढाई अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार, हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर