ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

वाघोलीत 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन, महिलांचा सहभाग

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वाघोली येथे ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन ‘मातृशक्ती’च्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास व परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा गौरव केला. खेळाडूंनी प्रामाणिकपणे खेळ सादर करून राज्याचा झेंडा जागतिक स्तरावर उंचावावा, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांचेही त्यांनी कौतुक केले. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हा सोहळा महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव असल्याचे नमूद केले. कुस्तीला जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळणे आवश्यक असून, खेळाडूंना योग्य सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी यंदाच्या स्पर्धेत महिलांचा लक्षणीय सहभाग असल्याचे सांगितले. सुमारे चार हजार महिलांनी सहभाग नोंदवला असून, कुस्तीविषयीचा दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले. या स्पर्धेची परंपरा स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी सुरू केली होती. त्यांचा वारसा पुढे नेत यंदाची स्पर्धा “स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी” येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर गाडी, उपविजेत्याला स्कॉर्पिओ, सुवर्णपदक विजेत्यांना १८ बुलेट आणि रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर गाड्या देण्यात येणार आहेत. १८ ते २२ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेकडे राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. वाघोलीतील नागरिकांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर