ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

सेनगावमध्ये भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास:पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव शहरात सोमवारी रात्री साडेसात वाजता बसस्थानक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती व्यंकटेश खुनेर (वय 30, रा. गंगाखेड) या गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या माहेरी सेनगाव येथे आल्या आहे. सोमवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास ज्योती खुनेर आणि त्यांची बहीण सुरेखा पाडळे या दोघी घरातून बसस्थानकाकडे पायी चालत जात होत्या. यावेळी बसस्थानकासमोरून विनानंबरच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर दोन अनोळखी तरुण आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. या चोरट्यांनी त्यांच्या बाजूने दोन वेळा चक्कर मारली. मात्र त्यांनी त्याच्या कडे दुर्लक्ष केले. मात्र तिसऱ्या वेळी चोरट्यांनी त्यांनी संधी साधत ज्योती यांच्या गळ्यातील अंदाजे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जोरात हिसकावले आणि अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून पळ काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दोघीही घाबरून गेल्या. त्यांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी ज्योती खुनेर यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भर रस्त्यात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण, जिवन मस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर