ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणांची वर्णी?:फडणवीस, सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीनंतर नवे समीकरण? चर्चांना उधाण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देशभरातील 24 रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एक जागाही विशेष चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आगामी 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणा प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या सलग भेटींमुळे राजकीय चर्चांना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा यांना राज्यसभेची संधी मिळू शकते का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध नावांची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र पक्ष नेतृत्व त्यांना केंद्रातील राजकारणात पाठवण्यास फारसे उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे या जागेसाठी इतर पर्यायांवरही गंभीरपणे विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार झाल्याची माहिती मिळत आहे. या नावांबरोबरच नवनीत राणा यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या सर्व पर्यायांवर चर्चा सुरू असून उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकमेव जागेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष राज्यसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नवनीत राणा यांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या गोटात नव्या चर्चांना उधाण आले असून सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर अखेर कोणाची निवड होणार, याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील जागेसाठी पक्षातील नेत्यालाच संधी देणार की नवनीत राणा यांच्यासारखा नवा चेहरा पुढे आणणार, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या एकमेव जागेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर