ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट‎कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन‎:अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व‎शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात‎यावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी‎विकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी ‎‎कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ‎‎आले. ही मागणी मान्य न झाल्यास ‎‎सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.‎असा इशाराही देण्यात आला.‎ शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन ‎‎केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎यांनी जून २०२६ मध्ये शेतकरी कर्जमाफी ‎‎करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ‎‎उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य‎सरकारने //”मित्र” संस्थेचे मुख्य कार्यकारी ‎‎अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर ‎‎२०२५ मध्ये समिती गठित केली. शेती‎कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर ‎‎भरण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.‎त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात‎कर्जमाफीची घोषणा करण्यात आली‎ होती. २ जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या ‎‎बैठकीत कर्जमाफी योजनेला मंजुरी‎देण्यात आली. त्यानंतर पात्र-अपात्र ‎‎तपासणीची मोहीम सुरू झाली. दरम्यान,‎२१ जून रोजी शेतकरी विकास मंचचे‎अध्यक्ष हुसेन खान यांच्या पुढाकारात‎धरणे आंदोलन करण्यात आले.‎आंदोलनात बहुसंख्य शेतकरी, शेतकरी‎संघटनांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्राशी‎संबंधित नागरिक सहभागी झाले होते. यात‎शेतकरी जागर मंचाचे संयोजक तथा कृषी‎अर्थतज्ज्ञ प्रशांत गावंडे, अक्षय राऊत,‎भास्कर डोंगरे, सुगत भटकर, अब्दुल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मन्नान, अमान इनामदार, जुबेर इनामदार,‎अब्दुल्ला खान, लियाकत अली खान,‎मोहम्मद अफजल, मतीन अहमद,‎रूपराव बागडे समवेत कास्तकार, कृषी‎संघटना, शेतकरी विकास मंच महाराष्ट्रचे‎पदाधिकारी, कास्तकार मोठ्या संख्येने‎उपस्थित होते.‎
‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अटींचा २० हजारांवर शेतकऱ्यांना‎बसणार फटका : कर्जमाफी योजनेनुसार‎३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या‎शेतकऱ्यांची संख्या, अन्य माहिती‎शासनस्तरावरून मागवण्यात आली होती.‎त्यानुसार प्राथमिकतः अकोला- वाशीम‎जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎४०४ खातेदारांकडे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत‎अंदाजे ६४१ कोटी थकले होते. मात्र शासन‎आदेश जारी झाल्यानंतर नेमका‎कालावधी समोर आला. त्यानुसार १‎एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक‎कर्ज थकीत असलेले शेतकरी पात्र‎आहेत. ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्ज फेडू न‎शकलेले शेतकरीही पात्र आहेत. यापूर्वी‎झालेल्या कर्जमाफी योजनेत लाभ‎घेतलेला शेतकरी पात्र ठरेल. तरीही पुन्हा‎कर्ज थकले असल्यास ५० हजारांपर्यंतचे‎कर्ज माफ होईल. मात्र सध्या झालेल्या‎तपासणीनुसार आकडेवारी कायम‎राहिल्यास अटी, निकष, कालावधीचा‎फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता‎आहे. विनाअट कर्जमुक्ती आवश्यक‎असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.‎ आंदोलनादरम्यान सरकारच्या धोरणांवर केली टीका‎ सरकारची कृषी व कास्तकार संदर्भातील‎तकलादू धोरणांवर आंदोलनात टीका‎करण्यात आली. सततची नैसर्गिक‎आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ,‎शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव,‎वाढते कर्जबाजारीपण यामुळे शेतकरी‎आर्थिक संकटात सापडला आहे.‎त्यामुळे सरकारने कोणत्याही प्रकारचे‎निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना‎सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. बिना‎अट, बिना शर्त सरसकट कर्जमाफी‎द्यावी. अशा मागण्या यावेळी करण्यात‎आल्या. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर‎शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी‎एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार‎व्यक्त करण्यात आला.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर