ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ठाकरे गटात फक्त 1 खासदार उरणार:खासदार फुटीच्या चर्चेवर आमदार नरेंद्र भोंडेकरांचा दावा, म्हणाले- उद्धव ठाकरे नव्हे, ‘कोअर टीम’ जबाबदार!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एक खळबळजनक दावा केला असून, यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेत केवळ एकच खासदार मागे उरेल, बाकी सर्व खासदार शिंदे गटात सामील होतील,असा दावा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तर ठाकरे गटाचे 9 पैकी 8 लोकसभा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होतील. आजच सर्व 8 खासदार येतील असे नाही, पण लवकरच हा प्रवेश निश्चित होईल असे त्यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधींच्या अडचणी समजून घेत नाही नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, आमदार आणि खासदारांच्या अडचणी काय आहेत, हे ठाकरे गटात कोणीही समजून घेत नाही. जर नेत्यांनी लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या असत्या, तर आज ही वेळ आली नसती. खासदार पैशांच्या आमिषाने किंवा इतर कारणांमुळे जात असल्याचा आरोप करणे सोपे आहे, पण ठाकरे गटाच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. उद्धव ठाकरे नाही कोअर टीम दोषी नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, या फुटीसाठी केवळ उद्धव ठाकरे दोषी नसून त्यांची ‘कोअर टीम’ जास्त दोषी आहे. खासदारांपाठोपाठ ठाकरे गटाचे अनेक आमदारही लवकरच आमच्या पक्षात येतील. असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर