ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती, पथदिव्यांचेही जिओ टॅगिंग करणार:पथदिवे देखभाल, दुरुस्ती पालिकाच करणार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनपा स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व नागरी सुविधांशी संबंधित तीन निर्णय घेण्यात आले आहेत. पूर्व आणि उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांची सफाई करणे, शहरातील सर्व पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी प्राप्त कमी दराच्या निविदेला मंजुरी आणि शिवणी स्मशानभूमीत शेड, प्रभाग क्रमांक १४, १६, २०मध्ये रस्ते व पेव्हर ब्लॉकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातील एलईडी पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती व नवीन एलईडी लाइट्स लावणे, सीसीएमएसचा पुरवठा, स्थापना व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत नामंजूर करण्यात आला. कारण यासाठी संबंधित कंपन्यांना दरमहा सुमारे ४७ लाख रुपये मोजावे लागले असते. हे पालिकेला परवडणारे नसल्याने हे काम पालिका उर्वरित पान ४ जिओ टॅगींग प्रकल्पांतर्गत प्रत्येक प्रभागातील दिव्यांची माहिती गोळा केली जाईल. जे विजेचे खांब सध्या रिकामे आहेत तेथे तसेच जे दिवे जुने किंवा ज्यांचा प्रकाश कमी झाला आहे, ते तातडीने बदलण्यात येतील. बैठकीच्या शेवटी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली की, सदस्यांच्या सूचनांचे पालन करावे. नालेसफाई योग्य झाल्याची खात्री करण्यासाठी सफाईपूर्वीचे व नंतरचे फोटो काढण्याची सूचनाही केली. ‘मॅपिंग’मुळे पथदिवे बंद पडल्यास त्वरित समजणार वेळेत आणि कमी खर्चात नालेसफाई झाल्यामुळे निधीची बचत होईलच, शिवाय पूर्व व उत्तर अकोल्यातील सखल भागांतील नागरिकांना जलमय होण्याच्या त्रासातून दिलासा मिळणार आहे. अंधार दूर करण्यासाठी पथदिव्यांचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. सर्व पथदिव्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिओ टॅगिंगमुळे डिजिटल मॅपिंग तयार होईल. त्यामुळे एखादा दिवा बंद असल्यास त्याची अचूक जागा त्वरित समजेल आणि तो वेळेत दुरुस्त होईल. सूचनांच्या पालनाचे निर्देश

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर