ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

गावाच्या सर्वंकष विकासासाठी मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा:ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन; पर्यावरण संवर्धनाचा केला निर्धार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“स्वच्छ नदी, हरित भविष्य व समृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित चांदूर येथे प्रथमच गावकऱ्यांच्या श्रमदानावर आधारित मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा रविवारी श्रीगणेशा झाला. या अभियानात संपूर्ण गाव, स्वयंसेवी संस्था, संघटना सहभागी होऊन नदी परिसर स्वच्छ करणार असल्याची माहिती चांदूर ग्रामपंचायतचे प्रशासक वैभव माहोरे यांनी याप्रसंगी दिली. जिल्ह्यात मोर्णा नदी ही एक प्रमुख नदी मानली जाते. चांदूर परिसरातून ती पुढे जाते. मात्र अलीकडे या नदीत घाण, कचरा व अनावश्यक वनस्पती साचल्यामुळे नदीचे वैभव नष्ट होत आहे. नदी स्वच्छतेचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. त्यामुळे आता नदी स्वच्छता अभियान श्रमदानातून राबवण्यात येत आहे. रविवारी अभियानाला प्रारंभ झाला. लोकसहभाग असल्याशिवाय कोणती योजना यशस्वी होऊ शकत नाही, असे आमदार रणधीर सावरकर याप्रसंगी म्हणाले. सरकारने केलेल्या कामामध्ये प्रत्येकाचे योगदान असणे ही आपली संस्कृती आहे. मानवतेच्या भावनेतून मोर्णा नदी स्वच्छता अभियान सुरू करून चांदूर येथील युवकांनी एक आदर्श निर्माण केला, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, ग्रा.पं. प्रशासक वैभव माहोरे, राजेश लुंगे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, गटविकास अधिकारी प्रमा पटोकार, खदानचे ठाणेदार मनोज केदारे, संजय कोरडे, वासुदेवराव टिकार, लखुआप्पा लंगोटे, देविदास बोदडे, संजय माहोरे, आदी होते. अनेकांचा सहभाग : नदी स्वच्छता अभियान हा उपक्रम सातत्याने लोकसहभागातून सुरू राहणार आहे. यात अनेक मंडळे व दानशूर व्यक्तींचे सहकार्यही मिळत आहे. नदी स्वच्छता अभियानानंतर नदी खोलीकरण केले जाणार आहे. नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम कार्यान्वित करण्याचा मानस आहे. यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा व हिरवे अकोला ही संकल्पना परिसरात दृढ होऊ शकेल. नदी स्वच्छता अभियानात संपूर्ण गावकरी, स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दोस्ती ग्रुपचा वाटा नदी स्वच्छ तर गाव स्वच्छ हा मूळमंत्र आत्मसात करून या अनुषंगाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत श्रमदान व लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता अभियान कार्यक्रम साकार करण्यात आला. यात गावातील दोस्ती ग्रुपचा सिंहाचा वाटा असून ५ हजार लोकसंख्येच्या गावात जुने मित्र एकत्र येऊन त्यांनी गावाच्या विकासासाठी हा उपक्रम साकार केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर