ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

घाटकोपरमध्ये बकरा कुर्बानीवरून तणाव:सागर पार्क सोसायटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; किरीट सोमय्या, माधुरी मिसाळ मैदानात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मीरा रोडमधील घटनेनंतर आता मुंबईतील घाटकोपर परिसरात बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचे दिसत आहे. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र यंदा अचानक मुंबई महानगरपालिकेने मध्यरात्री कुर्बानीची परवानगी रद्द केल्याने नवीन वाद निर्माण झाला. या निर्णयानंतर सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव पोलिस दलाची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली आहे. सोसायटीमधील काही नागरिकांनी कुर्बानीला विरोध दर्शवल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांमध्ये काही काळ वादाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे परिसरात तणाव वाढू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. संबंधितांकडून आम्ही सोसायटीच्या आवारात कुर्बानी करणार नसून पालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोसायटीचे नाव खराब करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे घाटकोपरमध्ये राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सागर पार्क सोसायटीत भेट देणार असल्याचे सांगितल्यानंतर परिसरातील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली. सोमय्या यांनी दावा केला की, कुर्बानीसाठी आणलेल्या 31 बकऱ्यांपैकी 23 बकरे मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहेत. यापुढे या ठिकाणी एकाही बकऱ्याची कुर्बानी होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुर्बानीसाठी पालिका योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरक्षा राखणे हे पोलिसांचे काम आहे, प्रत्येक ठिकाणी आम्हालाच जावे लागते, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही या वादावर प्रतिक्रिया देताना निवासी सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे कत्तलखाने तयार करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. धार्मिक सण साजरे करण्यास कुणाचाही विरोध नाही, मात्र ज्या ठिकाणी लोक राहतात त्या निवासी भागात अशा प्रकारे प्राण्यांची हत्या होणे योग्य नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे या विषयावरील राजकीय चर्चा आणखी वाढल्या आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आयुक्तांना पत्र या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पुणे पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा धार्मिक कार्यक्रमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मीरा रोडच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी पुण्यातही काही कट्टर प्रवृत्तीचे घटक निवासी भागांमध्ये अशा कार्यक्रमांच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद केले. तसेच महिलांशी गैरवर्तन, अश्लील वर्तन आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस, महापालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर