ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२ लाख ८० हजार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणातील आरोपी कुलकर्णी, वाघमारे व इतर संबंधित अधिकारी आणि दोषींना तत्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशा मागाण्या निवेदनाṇद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच सद्य:स्थितीत शेती मशागतीचे दिवस सुरू असून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर १५ ते २० किलोमीटरपर्यंत पंपावर न्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, इंधनाचाही अपव्यय होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर