ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे मोहीम : कृषि विभागाचा पुढाकार

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुष्काळी भागात पाणी साठवण क्षमतेत वाढ; शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलासा

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव : तालुक्यात जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी लोकसहभागातून विविध गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्याची मोहीम तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी चंदन निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू असून अनेक गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत.

या मोहिमेत छोटे ओढे व नाल्यांमधील वाहते पाणी रिकाम्या सिमेंट बॅगमध्ये रेती भरून अडविण्यात येत आहे. साठवलेल्या पाण्याचा उपयोग रब्बी पिकांसाठी संरक्षित ओलित करण्यासाठी होत आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते, जलस्रोत पुनर्जीवित होतात तसेच जनावरांसाठी शिवारात पिण्याचे पाणी उपलब्ध होते, अशी माहिती मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी दिली.

तालुक्यातील गावोगावी लोकांचा सहभाग घेत तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व सहायक कृषि अधिकारी श्रमदानातून वनराई बंधारे बांधकामाची मोहीम राबवत आहेत. आकापुर येथे बंधारे बांधताना सहायक कृषि अधिकारी रणजित सोयाम, कृषी सेवक सौदागर यादव यांच्यासह रविंद्र भोडे, मनोज निखाडे, स्वाती कुळमेथे तसेच ग्राम कृषी विकास समितीचे सहकार्य लाभले.

मोहिमेअंतर्गत उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होणार असून यामुळे तालुक्यातील गावे पाणीदार होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर