ब्रेकिंग न्यूज
News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क… Eknath Shinde: कुणबी जात प्रमाणपत्राचा शिंदे गटाला फटका! जातप्रमाणपत्र बोगस आढळल्यानं नगरसेविकेची निवड रद… मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!
SP News Maregaon

भडका:पेट्रोल 23, डिझेलची खरेदी 52 टक्के वाढली, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात मार्चच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल खरेदीत २३ तर डिझेलच्या खरेदीत ५२% वाढ झाली. यामागे साठेबाजीचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. इंधन बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापरासाठी वळवले जात आहे का, याचा गृह, पुरवठा विभाग तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, पंपांवर अतिरिक्त पुरवठा होत आहे. तरीही नियमित किरकोळ वापराचे इंधन साठवून ठेवले जात आहे की, ते अनधिकृत व्यावसायिक वापरासाठी वळवले जात आहे का, हे तपासावे लागेल. अकोल्यात इंधनाचा वापर १५४ तर संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून जास्त आहे. व्यावसायिक इंधन वापर मात्र थोडा कमी झाला. शेतकऱ्यांना पुरेसे डिझेल पुरवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. “इंधन साठेबाजीचे संकेत आहेत. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असेही ते म्हणाले. सर्व आकडे मार्च २०२६ ते २३ मे २०२६ । विक्रीचे आकडे सरासरी प्रतिदिन लिटरमध्ये जिल्हा पेट्रोल डिझेल वाढ (%) वाढ (%)
अहिल्यानगर २७% ६६%
अकोला ४४% १५४%
अमरावती २२% ८५%
संभाजीनगर ३५% ६७%
बीड २५% ७५%
बुलढाणा ४७% ६७%
चंद्रपूर २०% ८%
धुळे ७% ६८%
जिल्हा पेट्रोल डिझेल वाढ (%) वाढ (%)
हिंगोली १% ४६%
जळगाव ४४% ८५%
जालना ४९% ५८%
लातूर १६% ५५%
मुंबई शहर ११% १६%
मुंबई उपनगर १३% २३%
नागपूर १६% १९%
नांदेड २९% ११४%
जिल्हा पेट्रोल डिझेल वाढ (%) वाढ (%)
नंदुरबार ३०% ४१%
नाशिक २६% ७०%
धाराशिव १९% ८७%
परभणी २४% ७०%
पुणे ३१% ३७%
सोलापूर २५% ५१%
वर्धा ५३% २७%
वाशिम ४३% १०५%
व्यावसायिक वापर घटल्याने संशय सूत्रांनी सांगितले की, किरकोळ डिझेलची मागणी ५२ टक्क्यांनी वाढली असताना व्यावसायिक इंधनाचा वापर मात्र घटला. याची आकडेवारी समोर आल्यानंतर मुुख्यमंत्र्यांचा साठेबाजीचा संशय वाढला. (महाराष्ट्र राज्यात मार्च २०२६ पर्यंत सरासरी प्रतिदिन १, ७३,३७,००० लिटर पेट्रोल, ३,२२,५२,००० लिटर डिझेलची विक्री होत होती. २३ मे २०२६ पर्यंत पेट्रोल विक्रीत ३९,७५, ००० तर डिझेल विक्रीत १,६६,७६००० एवढी वाढ झाली. पेट्रोल विक्री २३ तर डिझेल विक्री ५२ टक्क्यांनी वाढली.) स्रोत : पुरवठा विभाग शालेय बस भाडेवाढीच्या हालचाली विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी काही शाळा स्वत:ची बससेवा चालवतात. त्यासाठी ते पालकांकडून वेगळे भाडे वसूल करतात. त्यापैकी बहुतांश शाळांनी बस भाडेवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही घाऊक खरेदीदार बचतीसाठी पंपांकडे वळल्याने मागणी वाढली महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले की, ऑइल कंपनीच्या डेपोतून टँकरने १५,००० लिटर किंवा त्यापेक्षा अधिक डिझेल खरेदी करणाऱ्यांना घाऊक ग्राहक मानले जाते. यामध्ये एसटी महामंडळ, रेल्वे, खाजगी वीज निर्मिती प्लँट्स, मोठे कारखाने येतात. घाऊक खरेदीचे दर सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या इंधनापेक्षा वाढले आहेत. त्यामुळे खर्च टाळण्यासाठी घाऊक खरेदीदार पंपाकडे वळल्याने मागणी वाढली, अशी शक्यता आहे. पुढे काय? गृह विभाग आणि पुरवठा विभागाची संयुक्त पथके पेट्रोल पंपांचे ऑडिट करणार; साठेबाजांवर गुन्हे दाखल होणार आणि दोषी पंपांचे परवाने रद्द होऊ शकतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर