ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

8 जणांचा अपघाती मृत्यू:रस्ता मक्तेदार मोकाट, सहाय्यकाला अटक; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आठ निष्पाप जीवांचा बळी घेतलेल्या तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयनने एस. यांनी मंगळवारी सकाळी थेट घटनास्थळ गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर स्वतः उभे राहून अधिकाऱ्यांना टेपने रस्त्याची मोजणी करायला लावली. या मोजणीत अपघातग्रस्त विहिरीचा भाग भूसंपदनात येत असूनही कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याचा एमएसआरडीसीचा निष्काळजीपणा उघड झाला. संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्ती पुढे अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. दरम्यान रात्री उशिरा रस्ता देखरेख सहाय्यक वैभव जरे यास पोलिसांनी अटक केली असली तरी मक्तेदार मोकाटच आहे. कार्तिकेयनने यांनी अपघातग्रस्त विहिरीसह ५०० मीटर अंतरावरील आणखी दोन धोकादायक विहिरी व पुलाची पाहणी केली. अपघातग्रस्त विहिरीजवळ कोणत्या उपाययोजना करणार असा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी संबधित अधिका-यांनी तात्पुरता कठडा बांधून कायमस्वरुपी विहीर बुजवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी तुम्ही भूसंपादनच केले नाही मग विहीर कशी बुजवणार असा प्रतिप्रश्न करताच अधिकारी निरुत्तर झाले. अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधास जबाबदार धरले जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, एमएसआरडीसीचे उप अभियंता पी. एस.राऊत उपस्थित होते. या भीषण अपघातामुळे राज्यात खळबळ उडाली. शासनाने अपघाती कुटुंबाच्या वारसांना सांत्वनपर मदत जाहीर केली. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांना उपस्थित राहण्याचा निरोप दिला होता. मात्र या कामाची माहिती असणारे सक्षम अधिकारी तांदूळवाडी घटनास्थळी उपस्थित नव्हते. प्रतिनिधी म्हणून उप अभियंता पी. एस.राऊत होते. रस्त्याबाबत सखोल माहिती त्यांना नव्हती. एमएसआरडीसीचे सक्षम अधिकारी गैरहजर, उपस्थितांना रस्त्याबाबत सखोल माहिती नसल्याने उत्तरे देता येईना पंढरपूर, सातारा महामार्गावरील तांदुळवाडी येथे रस्त्याचे कडेला असलेल्या धोकादायक विहिरीत छोटा हत्ती पडून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला मक्तेदार मोकाट असून सहाय्यकाला पोलिसांनी अटक केली आहे. यारस्त्याच्या कामात सहभागी असणारे व देखभाल करणारे वैभव जरे (रा. तांदुळवाडी) याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्याच्या ठेकेदारासह सर्व संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासात रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याच्या कामात सहभागी होऊन देखरेख करणारे वैभव जरे यास मंगळवारी चौकशीसाठी वेळापूर पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते. तपासात रस्त्याच्या काम करणाऱ्या कंपनीकडून वैभव जरे यांच्या बँक अकाउंटमध्ये पैशाचे ट्रांजेक्शन झाल्याचे उघड झाले आहे. ग्रामस्थांनी तांदुळवाडी हद्दीत वारंवार अपघात घडत असून रस्त्याची कामे भूसंपादनाप्रमाणे झाले नाही. रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हद्दीतील उघडे पुलावर सतत खड्डे पडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. सदर पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी केली. तक्रार करताच पुलाच्या कामाचे फोटो कार्तिकेयनने यांनी मोबाइलमधून टिपले. अपघात क्षेत्राच्या ठिकाणी दिशादर्शक सूचना फलक लावून अपघातग्रस्त विहिरीला तात्काळ आजपासूनच संरक्षक कठड्याचे काम सुरु करुन दोन दिवसांत पूर्ण करा. अपघात प्रवण क्षेत्रावर कायमस्वरूपी उपाययोजनांच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर