ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मोटेगावकर, प्रा.कुलकर्णीने ‘नीट’चा पेपर पालकांना विकला 10 ते 12 लाखांंत:पालकांनी पुढे नातेवाईक, मित्रांना विक्री केला 2 ते 10 लाखांत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘नीट’चा केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व ‘आरसीसी’चा संचालक प्रा शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केला आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रा.कुलकर्णी व प्रा. मोटेगावकर यांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे आपल्या सर्कलमधील अन्य लोकांना २ ते १० लाख रुपयांपर्यंत ते विक्री केल्याचीही माहिती मिळाली. शहरातील काही डॉक्टरांनी आपल्या मित्रांच्या पाल्यांना हे पेपर पुरवले. प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याने त्याच्याकडील प्रश्न पुण्यात स्पेशल क्लास घेऊन मुलांना पुरवले. त्याने असेच स्पेशल क्लासही लातुरात घेतले होते. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये हा पेपर नीट परिक्षेच्या आधीच आल्यानंतर, प्रा.कुलकर्णी आणि मोटेगावकर यांनी मिळून हे पेपर विकले असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे पथक लातुरात ठाण मांडून आहे. पाच डॉक्टरांची चौकशी, चौघांच्या मुलांनी दिली नीट सीबीआयने लातुरातील ५ डॉक्टरांची चौकशी केली आहे. त्यातील पाचही डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल्स आहेत. यातील चौघांच्या मुलांनी नीट परीक्षा दिलेली आहे. आपला व्यवसाय पुढे चालवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे त्यांचे स्वप्न होते. याच हव्यासातून पेपर खरेदीत त्यांचा समावेश असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. संशयित मुलांचे पेपर, नोट्सची पडताळणी ज्या पालकांनी पेपर खरेदी केल्याचा संशय आहे त्या मुलांची चौकशी सीबीआयच्या पथकाकडून सुरू आहे. या मुलांनी नीटची परीक्षा दिल्यानंतर सोबत आणलेली प्रश्नपत्रिका जप्त करण्यात येत आहे. त्यांनी क्लासमध्ये लिहून घेतलेले प्रश्न आणि फुटलेले प्रश्न यांची पडताळणी करण्यासाठी या मुलांच्या नोट्सही ताब्यात घेण्यात येत आहेत. परीक्षेनंतर मोटेगावकरचे प्रा.कुलकर्णीला शेकडो फोन नीट २०२६ ची परीक्षा होताच प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याने प्रा. शिवराज मोटेगावकर याचा मोबाइल नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये टाकला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटेगावकर हा प्रा.कुलकर्णीला संपर्क साधण्यासाठी वारंवार फोन करत होता. मात्र नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये असल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता. सीबीआयने कुलकर्णीला ताब्यात घेतले व मोबाइल तपासला तेव्हा मोटेगावकरचे शेकडो फोन येऊन गेल्याचे निदर्शनास आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर