ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

चंद्रपूर-गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रिचेबल:पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट घोडेबाजाराचा गंभीर आरोप करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल 23 नगरसेवक सध्या संपर्काबाहेर असून, पैशांच्या जोरावर त्यांना फोडण्यात आल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी या वेळी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमचे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि मी 100 टक्के सांगतो की, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले आहे. आमची ती सगळी लोक पैशाने विकली गेलेली आहेत. आता व्हीप जारी करून त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत आणि त्या नगरसेवकांना अपात्र करण्याचीह कारवाई आम्ही सुरू करू, असे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूरमध्ये घोडा बाजार सुरू कॉंग्रेसच्या नगरसेवकाचा भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्यासोबतचा एक फोटो समोर आला आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, फोटो जुना आहे की आताचा हे मी सांगू शकत नाही. परंतु, एक नक्की आहे की, चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडेबाजार सुरू केलेला आहे. या घोडा बाजाराची गरजही नव्हती. पण आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशांची गरमी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसत आहे. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, बिना श्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदाराचे ठेकेदार व्हायला लागले, तर काय नीतीमत्ता, नैतिकता काय राहिली? राजकारणात सत्ता आणि पावर हे दोन्ही एकत्र घेऊन काम होत राहिले तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. धमक्या देऊन राजकारण सुरू बंटी भांगडिया यांनी, तुमचे नगरसेवक तुम्ही सांभाळू शकला नाही, त्यात आमचे नाव का घेताय? असा सवाल केला होता. यावर प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, जर राज्यात सत्ता नसती तर कुत्रही मागे गेले नसते, सत्ता जाऊ दे आणि ने म्हणा उचलत, कोणात किती दम आहे तर. सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक देण्यासाठी करायचा, बँकेच्या संचालकांना धाक द्यायचा, यामुळे काही लोकांना घाबरवले. तर एका ठिकाणी सरपंचाचा मुलगा आहे, त्याला तुरुंगात टाकण्याचे धमकी दिली. अशा धमक्या देऊन राजकारण सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. पाच-पाच लाख रुपये दिल्याचे माझ्याकडे पुरावे मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, पाच-पाच लाख रुपये त्यांना देण्यात आले आहेत आणि माझ्याकडे तसे पुरावे आहेत. माझ्याकडे माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत, किती-किती पैसे घेतले, जे झाले ते क्लिअर आहे, आता अॅडव्हान्स दिला आहे. पुन्हा काही देतील. कोणी म्हणाले 10 लाख देऊ, कोणी म्हणतो 15 लाख देऊ, कोणी म्हणतो काँग्रेस जेवढे डेल त्याच्या डबल देऊ अशी चर्चा आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणूक बिनविरोध करायची असेल तर भाजपने सर्व जागांवर चर्चा करावी नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या भाजपच्या तयारीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर विजय वडेट्टीवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, जर ही निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर भाजपने केवळ एकाच जागेवर नव्हे, तर सर्वच्या सर्व जागांवर चर्चा करावी, असे त्यांनी सुनावले आहे. तसेच, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून काँग्रेसकडे उमेदवारांची नावे आली असून, पुढील एक-दोन दिवसांतच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर