ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

तुरुंगातूनही आंदेकर टोळीची दहशत!:अहिल्यानगरमध्ये मोठा कट उधळला, शस्त्रास्त्रांसह 5 सराईत गजाआड; लाखोंचा मुद्देमालही जप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे करणारी आंदेकर टोळी, त्यांचे प्रमुख तुरुंगात असतानाही शहरासह शेजारील जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून उघड झाले आहे. कारागृहाच्या भिंतींआड बसूनही पूर्ववैमनस्यातून या गुन्हेगारी कारवायांची सूत्रे हलवली जात असून, नुकतीच अहिल्यानगरमध्येही याची प्रचिती आली आहे. जिथे पोलिसांनी कारवाई करत आंदेकर टोळीतील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत आणि त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. आंदेकर टोळी तुरुंगातूनही सक्रिय असल्याचे उघडकीस आल्यानंतर, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य कारागृह प्रशासनाला पत्र लिहून आंदेकर पिता-पुत्रासह टोळीतील प्रमुख गुंडांवर कारागृहातच कडक निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, याच कुख्यात टोळीतील पाच जणांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिरावली पहाडच्या पायथ्याशी अटक केली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर, समर्थ दूधभाते आणि आकाश पवार या पाचही जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून, या धडक कारवाईमुळे दरोड्याचा एक मोठा कट उधळला गेला आहे. 4 पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, 1 कोयता आणि मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 4 पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, 1 कोयता आणि एका चाकूसह एकूण 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या या आरोपींपैकी समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते यांच्यावर पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि मकोका अंतर्गत यापूर्वीच अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. बंडू आंदेकर धुळे जिल्हा कारागृहात सध्या आंदेकर टोळीचा मुख्य सूत्रधार सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर हा धुळे जिल्हा कारागृहात, तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा नंदुरबार कारागृहात बंदिस्त आहे. खंडणी आणि खुनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या या पिता-पुत्रांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र असे असतानाही त्यांच्याकडून कारागृहातूनच चालवली जाणारी ही संघटित गुन्हेगारी संपूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आता पुणे पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर