ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पक्षाशी विश्वासघात म्हणजे आईशी विश्वासघात:उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना थेट ‘घरचा रस्ता’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच दिवसात पाच जाहीर सभा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्षांतर्गत बंडाळी आणि शिस्तभंगाबाबत अत्यंत कडक भूमिका मांडली. पक्षाशी विश्वासघात करणे म्हणजे स्वतःच्या आईशी विश्वासघात करण्यासारखे आहे, असे भावनिक आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जे कोणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करतील, त्यांना तत्काळ ‘घरचा रस्ता’ दाखवला जाईल. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आपला प्रचाराचा झंझावात सुरू केला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच दिवसात पाच जाहीर सभा घेत जिल्हा ढवळून काढला आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांनी जिंतूर ते गंगाखेड अशी जिल्ह्याची दोन टोके गाठत अत्यंत वेगवान दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या दौऱ्यात प्रामुख्याने जिंतूर तालुक्यातील इटोली, झरी, दैठणा, महातपुरी आणि वडगाव या पाच ठिकाणी सभांचे आयोजन करून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. या जाहीर सभांमधून बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विकासाच्या मुद्द्यावर भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले. मात्र, त्याच वेळी त्यांनी पक्षांतर्गत शिस्तीबाबत अत्यंत कडक संकेत दिले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात छुप्या किंवा उघडपणे काम करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही, त्यांना थेट ‘घरचा रस्ता’ दाखवला जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. बावनकुळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची मोठी खेळी दरम्यान, मुंबईत महापालिकेवर महापौर बसवण्यासाठी तसेच सत्ता स्थापनेच्या समीकरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल उचलले असून, महापालिकेत आपल्या तीन नगरसेवकांचा स्वतंत्र गट नोंदवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचा घटक पक्ष असूनही मुंबईत निर्माण झालेल्या विशेष राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने हा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे आता मुंबई महापालिकेत सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादीचा हा गट शिंदेंच्या शिवसेनेसोबत सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर