ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद व मका आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस लांबल्यास खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाअभावी केवळ पेरण्याच नव्हे तर पशुधनासमोरील चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या भागातील ग्रामीण भागात सध्या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकर पाऊस पडावा, अशी आस धरून शेतकरी बसला आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. ^बाजारपेठेतून खते व बियाणे आणून ठेवले असले तरी पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आणखी १५ दिवस समाधानकारक पाऊस झाला नाही तर पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहील. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनेल. चारा उपलब्ध न झाल्यास काही पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ येईल. — प्रमोद माळी, शेतकरी व पशुपालक, पांगरी ^खरीप पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. किमान ९० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसाची प्रतीक्षा करावी. — सुधीर काशीद, मंडळ कृषी अधिकारी, पांगरी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर