ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मराठी विद्यार्थ्यांनी घडवले बंगाली संस्कृतीचे दर्शन:सोलापूरच्या संघाची मुंबईमध्ये छाप, विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवन येथे केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २०) पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत, लोकनृत्य आणि कथ्थकच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केले. या सादरीकरणाबद्दल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सोलापूर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. दोन्ही राज्ये परस्परांपासून दूर असली तरी त्यांची अस्मिता समान असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. दोन्ही राज्यांना इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रवादाने जोडले असून, त्यांनी संत तुकाराम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद यांसारख्या महान विभूती तसेच स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यासारखे नेते देशाला दिल्याचे त्यांनी नमूद केले. बंगालने देशाला ‘वंदे मातरम’ व ‘जन गण मन’ ही राष्ट्रीय गीते दिल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक डॉ. केदारनाथ काळवणे, लोकभवनचे अधिकारी, कर्मचारी आणि मुंबईतील शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत
कार्यक्रमादरम्यान सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गा पूजेचे गीत ‘हे लो गिरी सून लो खोबोर’ सादर केले, तसेच पश्चिम बंगालच्या अजरामर व्यक्तिमत्वांची गाथा सांगणारे एकपात्री सादरीकरण केले. या प्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी देशाच्या विविध भागांतील पश्चिम बंगालच्या नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर