ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित ५७ व्या विचारमंथन, मार्गदर्शन, सन्मान सोहळा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षस थानावरून बोलत होते. या सोहळ्यात रिधोरा येथील सरपंच राजाभाऊ देशमुख व आळंदा येथील सरपंच दत्ताजी ढोरे यांना ‘लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा गौरव’, तर कविता ढोरे, उज्वला पाटील आणि अलका देशमुख यांना “लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच सुनंदा नराजे, साहित्यिक सुरेश पाचकवडे, डॉ. अशोक शिरसाट यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी सांगितले की, पत्रकार व सर्वसामान्य सभासदांच्या बळावर संघटना महाराष्ट्राबाहेर विस्तारून देशातील ६ राज्यांत पोहोचली आहे. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे डॉ. विनय दांदळे, प्रदीप खाडे, प्रा. डॉ. ममता इंगोले यांच्यासह त्रकार, सभासद व नागरिक उपस्थित होते. संचालन जया भारती इंगोले यांनी केले तर आभार आशिष पाटील वानखडे यांनी मानले. यावेठी कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर