ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शिंदे–अजित पवार गट हे शहांचे पक्ष, सुनेत्रा पवारांचा निर्णयही तिथूनच:भाजप मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल कुणालाच काही माहिती नाही, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याबद्दल शरद पवार बोलले ते अगदी योग्य आहे. शिंदे आणि अजित पवार यांचा गट हा भाजपच्या गर्भातून आलेली पिल्ल आहेत, ते अमित शहा यांचे पक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा काय निर्णय घ्यायचा तो अमित शहा आणि भाजपच्या भूमिकेवर ठरेल, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळणार अशा बातम्या मी ऐकत आहे. सुनेत्रा पवारांना हे पद मिळणार असल्याच्या बातम्या आम्हीही ऐकतो आहोत, हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे त्यावर आम्ही काय बोलणार. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्याने दु:खातून सावरलेला नाही एवढंच मी सांगू शकतो. अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणी भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर तो त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक निर्णय आहे. यावर कुणी इतराने मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही. अजित पवार गटात राष्ट्रीय नेत्यांची फळी संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ अशा असंख्य राष्ट्रीय नेत्यांची फळी त्यांच्या पक्षात आहे. या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहेत त्यांनी हा निर्णय घेतला असेल. कोणालाच काही माहिती नाही. अजित पवार यांचा वेगळा गट आहे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला असेल, शरद पवार जे बोलतात ते योग्य बोलतात. भाजपा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष संजय राऊत म्हणाले की, अजित पवार गटातील राष्ट्रीय नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे मी वाचले, त्यांनी हा निर्णय घेतला असेल. जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तो पर्यंत आम्ही राजकीय विषयावर बोलत नाही. बोलण्यासारखे भरपूर आहे. भाजपा हे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष एकढेच मी सांगू शकतो. भाजला दुखवटा, दु:ख या विषयाशी काही संबंध आलेला नाही. पण यावर बोलण्याची ही वेळ नाही. शहांनी पक्ष फोडले संजय राऊत म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र यावे हे अजित पवार असताना शक्य होते असे दिसत होते असं मला वाटते असे शरद पवार यांच्या बोलण्यातून जाणवते. आता यापुढे काय यावर मी काय बोलणार आहे. शिवसेना पक्ष गिळण्याचा भाजपचा प्रयत्न होता पण उद्धव ठाकरेंनी ते सर्व काही उधळून लावले. शिंदे गट, अजित पवार गट हे अमित शहा यांचे पक्ष आहे, त्यांनीच हे पक्ष तयार केले आहेत. राज्यातील प्रमुख घराणे आणि पक्ष फोडून त्यांनी हे पक्ष सुरू केले आहेत. अजित पवार गेल्याचं दु:ख महाराष्ट्राच्या घराघरात संजय राऊत म्हणाले की, अजित पवार गेल्याचं दु:ख महाराष्ट्राच्या घराघरात आहे, काही घरांना दु:ख झाले नसेल तर काही सांगता येत नाही, पण आमच्या कुटुंबियांना सुद्धा अजित पवार जाण्याचे दु:ख झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा पक्ष किंवा अमित शहा घेतील, भाजपची भूमिका ठरतील त्यानुसार शिंदे आणि अजित पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर