ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा सुमारे २० टक्क्यांनी घटल्याने जिल्ह्यात इंधनाचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. पुरवठा घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले असून ते बंद ठेवावे लागत आहेत. शहरात २० तर जिल्ह्यात सुमारे १२५ पेट्रोल पंप आहेत. तसेच शेतकऱ्यांची पूर्वमशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेलची मागणी वाढली आहे. उपलब्ध असलेला मर्यादित साठा सर्व नागरिकांना मिळावा, यासाठी पेट्रोल पंप चालकांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने इंधनाचे “रेशनिंग’ सुरू केले आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपयांचे, तर चारचाकी वाहनांना दोन हजार रुपयांचेच इंधन दिले जात आहे. अकोल्यात सध्या पेट्रोल १०८ रुपये आणि डिझेल ९५ रुपये प्रति लिटर आहे. मात्र, टंचाईच्या भीतीने ग्राहकांमध्ये ‘पॅनिक बायिंग’ सुरू झाले असून, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पंप काही वेळ होता ‘ड्राय’ ^बीपीसीएल, एचपीसीएल कंपन्यांचा पुरवठा काहीसा कमी असल्याने ग्राहकांचा ओढा इंडियन ऑइलकडे वाढला आहे. वाशीम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा असल्याने तेथील ग्राहकही अकोल्याकडे वळत आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात दररोज सुमारे १०० ते १२५ इंधन टँकर्स येत आहेत. काही टँकर्स आता गायगावऐवजी मनमाडवरून भरून आणावे लागत असल्याने वाहतुकीला वेळ लागत आहे. यामुळे काही काळ पंप कोरडे रहात आहेत. – नवीन सिंह ठाकूर, अध्यक्ष, पेट्रोल डिझेल असोसिएशन. महागाईची टांगती तलवार अर्थतज्ज्ञांच्या मते, इंधन टंचाई आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे सरकारने १५ मे पासून दोनदा लिटरमागे ३ रुपयांची दरवाढ केली आहे. या वाढीमुळे मालवाहतूक महाग होऊन येत्या काळात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि अन्नधान्याचे दर कडाडण्याची शक्यता असून, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल. दरम्यान, मोठ्या बांधकाम व पायाभूत सुविधा प्रकल्पांना १५० रुपये लिटरने डिझेलचा थेट पुरवठा सुरू असल्याने त्यांचे काम सुरू आहे, परंतु जनता होरपळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर