ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

प्रेमसंबंधाच्या संशयातून‎तरुणाची आत्महत्या‎:आरोपींवर गुन्हा दाखल‎करण्याची प्रक्रिया सुरु‎, वैराग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. मृत तरुणाचे नाव आरीम राजुद्दीन पठाण (वय २१, रा. पिंपरी आर) असे आहे. या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरीम याचे गावातील विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित महिलेच्या पती व कुटुंबीयांना आला होता. त्यातूनच दि. १० मे रोजी आरीम याला गौडगाव येथील नागोबा चौकात अडवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पिंपरी (आर) येथील संबंधितांच्या घरासमोर नेऊन बेल्ट, काठी व चप्पलने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी त्याचा मोबाइलही जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी १० मे च्या मारहाणीनंतरही आरीमचा पिच्छा सोडला नव्हता. दि. ११ मे, १६ मे आणि २६ मे रोजीही संबंधित आरोपींनी घरी जाऊन त्याला धमक्या दिल्या. तुला गावात राहू देणार नाही, तुला जगू देणार नाही, तुझे लग्न होऊ देणार नाही अशा प्रकारच्या धमक्यांमुळे आरीम मानसिक तणावाखाली होता. तपासादरम्यान पोलिसांना आरीमच्या पॅन्टच्या खिशात हस्तलिखित सुसाईड नोट आढळून आली. तसेच त्याच्या डाव्या हाताच्या तळहातावरही काही मजकूर लिहिलेला दिसून आला. सुसाईड नोटमध्ये संबंधित चार जणांकडून झालेल्या मारहाण, धमक्या आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सलीम सवाल पठाण, कलीम सवाल पठाण, सवाल अहमद पठाण, आजमतबी सवाल पठाण (सर्व रा. पिंपरी (आर), ता. बार्शी) या चौघांविरुद्ध वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर