ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘मयू, हे मला मारत घेऊन चालले आहेत, मला वाचव’:वेरूळचे शिक्षक बोरसे यांची शेवटची ही आर्त हाक असल्याचा मुलीचा ” दिव्य मराठी”कडे खुलासा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘माझ्या वडिलांनी फक्त माणुसकीच्या नात्याने वाद काय सुरू आहे ते विचारले. पोलिसांना तुमचे आयडी कार्ड दाखवा अशी विनंती केली. बस, याच गोष्टीमुळे पोलिसांचा इगो दुखावला गेला. त्यांनी वडिलांना तेथेच कानशिलात लगावली. त्यानंतर गाडीत कोंबून मारत नेले. आम्ही त्यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आणि आईलाही रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. वडिलांचे शेवटचे शब्द माझ्या कानात घुमतात- ‘मयू, मला वाचव…’
प्रेरणा हिने सांगितलेला घटनाक्रम जसाच्या तसा वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि मृत शिक्षकाची मुलगी जी कायद्याची विद्यार्थिनी आहे तिने ‘दिव्य मराठी’कडे त्या काळ्या रात्री घडलेला पोलिसांच्या क्रूरतेचा संपूर्ण थरार अश्रूंना वाट करून देत मांडला. प्रेरणा बोरसे हिचे लाडाचे नाव मयू आहे. त्या आरोपींनी गाडी सुरू केली. माझी बहीण कादंबरी ही गाडीला आडवी झाली होती. गाडी सुरू असतानाच मी, माझी बहीण आणि आई रस्त्यावर फरफटत गेलो. शेवटी आम्ही कशाबशा ताकतीने पप्पांना गाडीबाहेर ओढून काढले. पण तोपर्यंत त्यांचे प्राण निघून गेले होते. त्यांनी एक शेवटचा कटू कटाक्ष टाकला आणि डोळे मिटले. बोरसे तेथून निसटून स्कूटीने घरी यायला निघाले तेव्हा संशयितांच्या कारने त्यांच्या स्कूटीला जोरात धडक दिली, ज्यामुळे हँडल लॉक झाले. त्यानंतर आधी पांढऱ्या गाडीत आणि नंतर काळ्या स्कॉर्पिओत, जिचा नंबर 302 होता त्यात बोरसे यांना बळजबरीने कोंबण्यात आले. वरदने पळत जाऊन घरात सांगितल्यानंतर दोन्ही मुली आणि आई घटनास्थळाकडे धावल्या. बोरसे यांची मुलगी मयू सांगते, मी गाडीचे दार ताकदीने ओढून धरले होते. आत एक माणूस पप्पांच्या बाजूला होता आणि पप्पा हात बाहेर काढून मला वाचवण्याची विनवणी करत होते. गाडीतील दुसरा माणूस मला मागच्या बाजूने ओढून झटापट करत होता. शिक्षक बोरसे हे नाशिकवरून सुट्यांसाठी आलेल्या मामाच्या मुलासोबत छोटा मुलगा वरद औषध आणि आइस्क्रीम आणायला गेले होते. तेथे काही गाड्या आणि महिला दिसल्याने सुरेश बोरसे चौकशी करायला गेले. पोलिसांनी त्यांना ‘चला, तुम्हाला घेऊन जातो’ असे धमकावताच बोरसे यांनी त्यांची ओळख मागितली. याचा राग येऊन पोलिसांनी बोरसे यांच्या कानशिलात मारली आणि त्यांना वाचवायला गेलेल्या लहान मुलाला (वरद) धक्का देऊन खाली पाडले. यावेळी त्यांनी पोलिसांना तुमचे आयडी कार्ड दाखवा अशी विचारणा केली होती. घटना घडल्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून खुलताबाद ठाण्याने ३० तास टाळाटाळ केली. कुटुंबाला 2 ते 3 फेऱ्या माराव्या लागल्या. मुलीने सांगितले, रात्री घटनास्थळावर पोलिस उपस्थित होते आणि ते सरकारी कामात अडथळा आणल्याची दमदाटी करत होते. पोलिस स्वतः तिथे हजर होते आणि व्हिडिओत चेहरे दिसत आहेत तर एफआयआरमध्ये आरोपींना ‘अज्ञात’ का दाखवण्यात आले? मारहाण करणारे पोलिस आणि साथीदार दारूच्या नशेत धुंद असावेत, असा संशय व्यक्त केला आहे. स्कूटीस संशयितांच्या कारने दिली धडक मुलींसह आईला रस्त्यावर फरफटले 1 कायद्याची दीक्षा घेणाऱ्या मुलीने डोळ्यांदेखत वडिलांची हत्या होताना पाहिली. या मुलीच्या जबाबावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाब का नोंदवला नाही? 2: एफआयआर नोंदवण्यासाठी पीडित कुटुंबाला 30 तास पोलिस ठाण्याचे उंबरठे का झिजवावे लागले? हा वेळ आरोपींना जामिनाचे ग्राउंड तयार करण्यासाठी दिला गेला का? 3: “हे आमचे काम नाही, तुमचे तुम्ही बघा असे म्हणून तडफडणाऱ्या शिक्षकाला रुग्णालयात नेण्यास नकार देणाऱ्या त्या ऑन-ड्यूटी पोलिसांवर गुन्हा का नोंदवला गेला नाही?

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर