ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

मतीन पटेलवर कारवाईनंतर इम्तियाज जलील आक्रमक:म्हणाले- आम्ही घर पुन्हा बांधणार; तर जलील यांनीच निदा खानला मदत केल्याचे म्हणत संजय शिरसाटांचा पलटवार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने पहाटेच्या सुमारास नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. काही दिवसांपूर्वीच या घराला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रशासनाने थेट कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापले आहे. कारवाईदरम्यान मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी वेगळाच पवित्रा घेतला. महापालिकेचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचताच कुटुंबीय हार घेऊन स्वागतासाठी उभे राहिले होते. घरावर नोटीस लावण्यात आल्यानंतरही उत्तर देण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर नियमांनुसार कारवाई करत घर जमीनदोस्त करण्यात आले. या संपूर्ण घडामोडीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या कारवाईनंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मध्यरात्री नारेगाव परिसरात जाऊन नागरिक आणि समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी उपस्थितांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. मी शेवटच्या आशेने येथे आलो आहे. पुढच्या वेळी येईन तेव्हा मतीन पटेल माझ्यासोबत असतील, असे वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी महापालिका पथकाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने सात दिवसांचा अवधी दिला असेल तर महापालिकेने 24 तासांचीही प्रतीक्षा का केली नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला गेला नाही, असा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. आज घर पाडले गेले असले तरी पुन्हा ते उभे राहील, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना इम्तियाज जलील यांनी एमआयएमला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. पोलिस, सत्ता आणि प्रशासन त्यांच्या हातात आहे. आम्ही न्यायालयात जातो, पण न्यायालयाच्या निर्णयालाही किंमत दिली जात नसेल तर आम्ही न्याय कुठे मागायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मतीन हा माझा विश्वासू माणूस मतीन पटेल यांच्याविषयी बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मतीन हा माझा विश्वासू माणूस आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तर त्याची अंमलबजावणीही समान पद्धतीने झाली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणामुळे संभाजीनगरातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्ही घर पाडले तरी आम्ही बांधणार – इम्तियाज जलील देशातील गुंडाराजला देशातील लोक त्रस्त झाले असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. त्यामुळे मतीन खान यांचे जे घर पाडण्यात आले ते पुन्हा बांधण्यासाठी सर्वजण मदत करतील. या माध्यमातून सरकारला एक मेसेज द्यायचा आहे की, तुम्ही गुंडगिरी करून घर पाडू शकता, मात्र घर बांधण्याची ताकद, हिम्मत ही आमच्या मध्ये आहे. असेही जलील यांनी म्हटले आहे. ज्या माणसाचे घर पाडले गेले, त्याला आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलेले नाही. यामध्ये मीडिया देखील दोषी असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. शहरात केवळ हे एकच घर अतिक्रमणात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शहरात सुमारे 40% अनधिकृत मालमत्ता आहे. ज्यामध्ये अनेक नगरसेवकांची घरे देखील आहेत. त्या संदर्भातली कागदपत्रे आमच्याकडे आहेत. अशावेळी अतिक्रमण धारक नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश स्वतः आयुक्तांनी दिलेले आहेत. मग त्यांचे घर का पाडण्यात आले नाही? असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला. निदा खान यांना लपवण्यामध्ये जलील यांचाच हात – संजय शिरसाट आरोपीला पाठिंबा देण्यासाठी इम्तियाज जलील सभा कशी घेतात? असा प्रश्न पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विचारला आहे. या संपूर्ण प्रकरणात जलील यांनी निदा खानचे नाव कुठेही घेतलेले नाही. ते प्रकरण गंभीर आहे. जलील सर्वांचे मसिया झाले असल्याचा भाव आणत आहेत. वास्तविक मतिन छोटासा प्यादा असून निदा खानला शहरात आणण्यामागे इम्तियाज जलीलच असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. जलील हे इस्लामला मानत असतील, कुरान शरीफला मारत असतील तर, त्यांनी त्यावर हात ठेवून निदा खानला मी शहरात आणले नव्हते, हे सांगावे, असं आव्हान केले आहे. त्यामुळे माझे त्यांना ओपन चॅलेंज आहे की, निदा खान यांना लपवण्यामध्ये जलील यांचाच हात आहे. तेच मुख्य आरोपी आहेत. मतीन खान हा छोटा नगरसेवक आहे तर मुख्य इम्तियाज जलीलच असूनच त्यांच्या सांगण्यावरूनच निदा खानला येथे आणले गेले होते. असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला आहे. इतकेच नाही तर इस्लामचे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे काम जलील करत असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर