ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नगर तालुक्यात जनगणनेचा श्रीगणेशा; शिक्षकांचे चहा-पाण्याने स्वागत:नेप्तीसह परिसरातील गावांमध्ये घरयादी व घरगणनेसाठी नागरिकांचा प्रतिसाद‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव आदी भागांत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या नेप्ती व परिसरामध्ये जनगणनेचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या कडक उन्हातही प्रगणक म्हणून नियुक्त केलेले शिक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम करत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी चहा, थंड पाणी आणि अल्पोपहार देऊन शिक्षकांचे आपुलकीने स्वागत केले. नागरिकांशी संवाद साधताना प्रगणक शिक्षक संभाजी कांडेकर यांनी जनगणनेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, नागरी सुविधा आणि निधी वाटपासाठी ही अचूक माहिती अत्यंत आवश्यक असते. ३४ प्रश्नांच्या आधारे माहितीची नोंद नेप्ती येथील प्रगणक यादी गट क्र. २६१ मध्ये जनगणना प्रगणक शिक्षक बाळासाहेब कड व संभाजी कांडेकर यांनी घरोघरी जाऊन जनगणनेच्या नमुन्यातील ३४ प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित केली. यावेळी कुटुंबातील एकूण सदस्य संख्या, शैक्षणिक स्थिती, रोजगार, निवास व्यवस्था तसेच विविध सामाजिक बाबींची माहिती काळजीपूर्वक नोंदवण्यात आली. यावेळी रामदास फुले, शंकर फुले, जानकाबाई फुले आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर