ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नशामुक्त भारत अभियान:राज्यस्तरीय निबंध, चित्रकला अन् रील्स स्पर्धा; 21 जूनपर्यंत मोफत नावनोंदणीचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात निर्माण होणारे दुष्परिणाम, त्याविरोधातील जनजागृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. साहित्य, कला आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये घोषवाक्य (स्लोगन), निबंध लेखन, चित्रकला आणि रील्स निर्मिती या प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर, व्यसनमुक्त समाज निर्मितीवर तसेच युवकांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 21 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. हा सहभाग विनामूल्‍य करण्यात आला आहे. दरम्यान, 26 जून रोजी ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. मोठ्या संख्यने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन टास्‍क फोर्सच्‍या विशेष पोलिस महानिरीक्षक ज्‍योतीप्रिया सिंग यांनी केले आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या एनएसएस विभागाशी तसेच अमली पदार्थ टास्‍क फोर्सचे उपनिरीक्षक अक्षय सरोदे यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर