ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘हम साथ साथ है… काही वाद नाही’:छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनी फेटाळल्या वादाच्या चर्चा; मीडियासमोर नेमके काय म्हणाले?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच, ‘देवगिरी’ बंगल्यावरील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या वृत्तानंतर आज दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली आणि या कथित वादावर सविस्तर स्पष्टीकरण देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले, राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांवरुन महायुतीत समन्वयाने चर्चा सुरु आहे. या निवडणूकांवरुन आमच्यातील कोणी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. येऊ घातलेल्या निवडणूकात महायुतीला निर्भेळ यश मिळवायचे असल्याने चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो. उद्यापर्यंत आम्हाला वेळ आहे. उद्या दुपारपर्यंत जागाचे नक्की होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. हम साथ साथ है…काही वाद नाही त्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, केवळ मला बोलायचे असल्याने मी त्याला थांबायला सांगितले, आता आम्ही एकत्र आहोता. ‘हम साथ साथ है…काही वाद नाही…’ कधी कोणी जास्त ‌बोलले तर आपण बोलतो थांबा जरा तसे झाले होते, असे म्हणत पक्षाच्या बैठकीत दोघांमध्ये झालेल्या वादावर स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले आहे. बैठकीत काय झाले होते? दरम्यान, मंगळवारी, 26 मे रोजी ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईत असूनही ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सुरुवातीलाच चर्चेला उधाण आले. या बैठकीत बोलताना पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या पश्चात आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. मात्र जेव्हा आमच्यावर टीका होते, तेव्हा पक्षातील अन्य कोणताही नेता त्याचे खंडन करण्यासाठी पुढे येत नाही. आम्ही दोघेच नेहमी टीकेचे धनी का? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर आक्षेप घेत, ‘हे मुद्दे इथे मांडू नका, आता जे झाले ते विसरून जा,’ असे सांगत छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि तणाव निर्माण झाला. याच बैठकीत आणखी काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सुनील तटकरे यांचे भाषण सुरू असतानाच पार्थ पवार अचानक बैठकीतून उठून निघून गेले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. याशिवाय, बैठकीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही मित्रपक्ष असलेल्या भाजपबद्दलची आपली खंत उघडपणे बोलून दाखवली. भाजपकडे वारंवार मागणी करूनही ते आपल्याला अर्थखाते देत नसल्याची मोठी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एकूणच, पक्षांतर्गत कलह आणि मित्रपक्षाकडून होत असलेली कोंडी यामुळे देवगिरी बंगल्यावरील ही बैठक चांगलीच गाजली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर