ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

स्वच्छतागृहातील फलकांवरुन परिवहन मंत्र्यांनी विचारला जाब:प्रताप सरनाईकांनी केल्या एसटी अधिकाऱ्यांना सूचना‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रथम स्वच्छता गृहाचे (प्रसाधन गृह) निरीक्षण केले. स्वच्छता गृहाच्या प्रवेशद्वारावर ‘१ जून २०२६ पासून मोफत सेवा’, असा फलक होता; तर आतमध्ये शौचालयाकडे जाणाऱ्या भिंतीवर ‘प्रथम पैसे द्या’, असे ऑइल पेंटने नमूद केले होते. यावरून सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत फलकांबाबत हा गोंधळ का? असा सवाल केला. त्यानंतर लगेच तेथील कर्मचाऱ्यांनी आतमधील “प्रथम पैसे द्या’, हे पुसण्याची प्रक्रिया सुरू केली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्त १ जूनपासून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रवाशांना एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार येत आहे. दरम्यान ८ जून रोजी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमासाठी अकोल्यात परिवहन मंत्री तथा पक्षाचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक आले. त्यांनी प्रथम थेट मध्यवर्ती बस स्थानक परिसराची पाहणी केली. बसस्थानकातील स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनासरनाईक यांनी दिल्या. यावेळी एसटी स्टँडजवळच खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस उभी करण्यात येत असून अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका महामंडळावर बसत असल्याचा प्रकार माध्यमांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लक्षात आणून दिले. यावर २०० मीटर परिसरात अशी वाहतूक आढळून आल्यास संबंधितांवर कारवाईचा आदेश दिल्याचे सरनाईक म्हणाले. याच अनुषंगाने महामंडळावर आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले. सरनाईक मध्यवर्ती बस स्थानकावरून ११.३५ च्या सुमारास गोरक्षण रोडवरील कार्यक्रमस्थळी रवाना झाले. त्यानंतर दुपारी २.१७ च्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकाच्या अगदी आवार भिंतीला लागूनच कारंजाकडे जाणारी खासगी बस प्रवाशांसाठी उभी करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे खासगी प्रवाशी बस चालक कोणत्याच इशाऱ्याला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जुने व नवीन बस स्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र दौरा संपताच पुन्हा “जैसे थे’ स्थिती झाल्याचे दिसून आले. विविध कामांसाठी १५ कोटी खर्च होणार असून, मध्यवर्ती बस स्थानकांवर दिवसेंदिवस वर्दळ वाढतच आहे. एसटी बसस्थानक हे प्रवाशांच्या विश्वासाचे केंद्र बनावे, यासाठी स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. सरनाईक यांच्या स्वागतासाठी स्थानकाच्या मुख्यद्वारावर स्वागताची तयारी करण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वच्छतागृहाकडे धाव घेत पाहणी केली. एसटीचे कर्मचारी व प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि जाणून घेतल्या. त्यांना मदतीसाठी टोलफ्री क्रमांक कोणता आहे, हेही विचारले. बसस्थानक परिसरात काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत एसटी ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असल्याचे अधोरेखित केले. बसेसच्या वेळापत्रकानुसार धावण्याची स्थिती, चालक-वाहकांची उपस्थिती, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने नियमित निरीक्षण करून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरनाईक हे मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी करत असतानाच मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येत होती. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला केव्हा काम सुरू करतो, यासह अन्य माहिती विचारली. मंत्री स्थानकातून जाताच बाहेरच खासगी बस उभी प्रवासी, कर्मचाऱ्यांशी संवाद

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर