ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सुपर वुमन बाईक रॅलीने महिला दिन साजरा:महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांची सुपर वुमन बाईक रॅली काढण्यात आली. क्रांती चौकापासून सुरु झालेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झाला. महिला या शक्तीचे स्वरुप असतात, गरज आहे ती फक्त महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला. आज सकाळी साडेसात वा. क्रांती चौकात महिलांच्या बाईल रॅलीचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, शिक्षणाधिकारी माध्यमिक आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकरी प्राथमिक जयश्री चव्हाण तसेच प्रशासनातील महिला अधिकारी – कर्मचारी या रॅलीत उत्साहात सहभागी झाल्या. रॅलीत महिला सक्षमीकरणाच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. पैठण गेट, तापडिया रंगमंदिर मार्ग, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत औरंगपुरा भाजी मंडी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. महिला ह्या समाजाचा निम्मा भाग आहे. त्यांची बुद्धिमत्ता, शक्ती याचा उपयोग झाल्यास आपला समाज अनेक क्षेत्रात आघाडीवर जाईल.त्यासाठी महिलांनी स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्याचा विकास करायला हवा,असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रास्ताविक संगिता राठोड ह्यांनी तर आभार आश्विनी लाठकर यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर