ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

शिवरायांचा इतिहास आता नव्या रूपात:विराग वानखडे साकारणार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर येथील विश्वविक्रमी व्यक्तिमत्त्व विराग वानखडे हे महानाट्य साकारणार असून त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने पुढाकार घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कलावंत, अभियंता व चित्रपट निर्माते अशी विराग वानखडे यांची ओळख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ८० कलाकारांना घेऊन त्यांनी महानाट्य उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर व त्यांच्या अर्धांगिनी माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी विराग वानखडे व आयएएस अकादमीचे प्रा. नरेशचंद्र काठोळे यांचा सत्कार केला. ते म्हणाले, या महानाट्याच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. वानखडे व काठोळे यांनी चिखली येथे जाऊन खेडेकर दाम्पत्याची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला. विराग वानखडे यांनी आठ वेळा जागतिक विक्रम केला असून आता ते नववा विश्वविक्रम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सादर केले आहेत. नुकतेच त्यांचे ‘महा इतिहास’ हे महानाट्य संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले. हल्ली मुंबई येथील कार्यालयातून कामकाज सांभाळणाऱ्या विराग वानखडे यांच्या चमूत महाराष्ट्रातील इतर ८० कलाकारांचा समावेश आहे. त्यांना घेऊनच ते हे महानाट्य उभारणार आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य तयार करून त्याचे प्रयोग संपूर्ण भारतात करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. याप्रसंगी विराग वानखडे यांनी महानाट्याची पूर्ण रूपरेषा खेडेकर यांना समजावून सांगितली. पटकथा लेखनासाठी पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा, गंगाधर बनबरे व इतर ज्येष्ठ संशोधक यांचे सहकार्य घेण्याचेही याप्रसंगी ठरविण्यात आले. या महानाट्याच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या प्रारंभिक बाबींची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य होणार असल्याने मिशन आयएएसचे ठिकठिकाणी अभिनंदन होत आहे. पुस्तके भेट देऊन सत्कार यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विराग वानखडे, त्यांच्या पत्नी वंदना वानखडे व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी चिखली येथे जाऊन पुरुषोत्तम खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांनी हा प्रस्ताव उचलून धरला आहे. हा प्रस्ताव आणल्याबद्दल तिघांचाही पुस्तके भेट देऊन सन्मान केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर