ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

अकोल्याच्या दुर्गम भागात मुक्कामी एसटी पुन्हा धावली:15 जुनपासून राजूर ते रतनवाडी, सांम्रद, घाटघर ते शेंडी व परत राजूर ही बस धावणार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, पर्यटकांची पंढरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यातील दुर्गम रतनवाडी आणि साम्रद गावांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुक्कामी एसटी बस सेवा १८ मेपासून पूर्ववत सुरू झाली. ही बस गावात दाखल होताच स्थानिक आदिवासी बांधव, महिला आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष करत बसचे पूजन केले. माजी मंत्री तथा आदिवासी मधुकरराव पिचड यांनी या भागातील पर्यटन आणि जनसेवेसाठी ही मुक्कामी बस सेवा सुरू केली होती. मात्र, काही महिन्यांपासून ती बंद असल्याने दुर्गम भागातील जनता पूर्णपणे विस्कळीत झाली होती. समाजसेवक अनंत घाणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून संगमनेर येथून सुटणारी रतनवाडी-साम्रद ही मुक्कामी बस पुन्हा सुरू झाली आहे. या दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीचे दुसरे साधन नसल्याने बस बंद असल्याचा सर्वाधिक फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत होता. आजारी रुग्ण, वयोवृद्ध आणि गरोदर मातांचे रुग्णालयात जाणे कठीण झाले होते. ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सांदण व्हॅली’ (साम्रद) आणि अमृतेश्वर मंदिरासाठी (रतनवाडी) येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी कोंडी झाली होती. आता ही सेवा सुरू झाल्याने सर्वांचीच मोठी गैरसोय दूर झाली आहे. रतनवाडी-साम्रद बस पूर्ववत सुरू करण्यासोबतच या भागातील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, १५ जूनपासून राजूर ते रतनवाडी-घाटघर ही नवीन दुपारची बस सेवा (दुपारी १२.३० वा.) सुरू करण्याचे धोरण अकोले आगाराने आखले आहे. नवीन ‘रिंग रोड’ बससेवेमुळे दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. आदिवासी भागातील प्रवाशांचा गंभीर प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अकोले आगारप्रमुख सुरेश दराडे आणि सहाय्यक बाळासाहेब गंभीरे यांचा समाजसेवक अनंत घाणे व आदिवासी कार्यकर्त्यांच्या वतीने विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले. ही बससेवा आता कायमस्वरूपी सुरू राहील आणि कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही आगारप्रमुख दराडे यांनी दिली. यावेळी सरपंच एकनाथ सारुकते, उपसरपंच भरत झडे, संदीप झडे, तुकाराम सारूकते, सागर रोंगटे, तुकाराम खाडे, रामदास पिचड यांच्यासह वाहतूक नियंत्रक आर. टी. देशमुख व डी. व्ही. खाडे उपस्थित होते. रतनवाडी मुक्कामी बस ^ संगमनेर येथून ३.३० वाजता सुटून राजूर मध्ये ५ वाजता व शेंडी येथे ५.३० वाजता पोहोचेल. ती रतनवाडी येथे मुक्कामी ६.३० वाजता येईल. सकाळी मुक्कामाच्या ठिकाणावरून ६.३० वाजता निघून शेंडी, राजूर, अकोले मार्गे संगमनेरला ९.३० वाजता पोहोचेल. निवेदनानुसार संगमनेर ते रतनवाडी-सांम्रद अशी बस सेवा सुरू राहील. यामुळे आदिवासी परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. – सुरेश दराडे, अकोले आगार व्यवस्थापक.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर