ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

गडचिरोलीच्या दुर्गम भागात 20 हजार धुररहित चुलींचे यशस्वी वितरण:दरवर्षी 41 हजार टन जळाऊ लाकडाची होणार बचत

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि एटापल्ली या दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये 20 हजार धुररहित सुधारित चुलींचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. पारंपरिक चुलींमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे महिला आणि बालकांना श्वसनाचे विकार आणि डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, या सुधारित चुलींमुळे घरातील प्रदूषण 100 टक्के थांबले असून, महिलांचे आरोग्य सुधारण्यास लक्षणीय मदत झाली आहे. पूर्वी दुर्गम भागातील महिलांना सरपण गोळा करण्यासाठी दररोज अनेक तास जंगलात घालवावे लागत होते. धुररहित चुलींमुळे जळाऊ लाकडाची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तब्बल 95 टक्के कुटुंबांनी नोंदवले आहे की, लाकूड गोळा करण्याचा आणि स्वयंपाकाचा वेळ वाचल्यामुळे महिलांना कुटुंब, मुलांचे शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे.हा उपक्रम केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून वनसंवर्धनासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

या चुलींच्या वापरामुळे दरवर्षी तब्बल 41 हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची बचत होणार आहे. यामुळे जंगलांवरील ताण कमी होऊन जैवविविधतेचे रक्षण होईल आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे दरवर्षी अंदाजे 9 हजार 200 टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य हरितगृह वायूचे उत्सर्जन टळणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातून उभे राहिलेले हे एक अत्यंत प्रभावी मॉडेल ठरले आहे. आतापर्यंत 19 हजार 600 हून अधिक कुटुंबांनी या उपक्रमाचा थेट लाभ घेत स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार केला आहे. हा यशस्वी प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर