ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

धुळ्यात सावत्र बापाकडून गुंगीच्या गाेळ्या देऊन18 वर्षीय तरुणीवर अत्याचार:आंब्याच्या रसातील ‘त्या’ काळ्या गोळीमुळे फुटले बिंग

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


धुळे शहरापासून जवळ असलेल्या एका गावात सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित मुलीने शेजारील महिलांच्या पुढाकाराने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या नराधमास अटक केली आहे. याबाबत 18 वर्षीय तरुणीने तक्रार दिली की, घरात स्वंयपाक करताना सावत्र वडील घरात आले. तरुणीजवळ उभे राहून ते आंब्याचा रस करत होते. यावेळी त्यावर काळा रंग तरंगतांना आढळला. तरुणीने विचारल्यावर वडिलाने काही नाही असे सांगून वेळ मारुन नेली. ..अन् सावत्र बापाने अतिप्रसंगाचा व्हिडिओ दाखवला यावेळी त्यांच्या हातातील एक काळी गोळी चुकून खाली पडली. त्यामुळे मुलीने रात्री जेवणात आंब्याचा रस घेतला नाही. शिवाय ती घराबाहेर जाण्यास निघाली. त्यावेळी सावत्र वडिलाने आपल्या मोबाइलमधील व्हिडिओ तरुणीला दाखवला. त्यामध्ये झोपेत असलेल्या तरुणीवर सावत्र वडिल अतिप्रसंग करत असल्याचे दिसले. त्यामुळे पीडितेने घराबाहेर पळ काढला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन सावत्र वडिलाविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करुन त्याला अटक झाली आहे. सहा वर्षांपासून करत होता अत्याचार पीडीतेची आई एका ट्रॅव्हलिंग कंपनीत कामाला आहे. त्यामुळे कामानिमित्त ती नेहमी बाहेर असते. तिच्या अपरोक्ष ही घटना घडली. तर आंब्याच्या रसात टाकतांना खाली पडलेली गोळी मुलीने कागदाच्या पुडीत बांधून ठेवली. शिवाय ती पोलिसांना दिली आहे. प्रयोगशाळेत या गोळीची तपासणी होणार आहे. तर मोबाईलमधील व्हिडिओ हा पीडिता 12 वर्षांची असताना म्हणजे सहा वर्षापूर्वीचा आहे. तेव्हापासून गुंगीचे औषध देऊन हा अत्याचार झाल्याचा संशय आहे. हिंगोलीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार दुसरीकडे हिंगोलीमध्ये हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला अन महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात न केल्यामुळे संबंध तोडणाऱ्या एका विवाहित तरुणाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा पती मागील 12 वर्षापासून बेपत्ता झाला आहे. त्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत विवाहित तरुण वैजनाथ शिंदे याने तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. अन् त्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर