ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते:अजित पवारांच्या आठवणीने संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर; पवार कुटुंबासोबतच राहण्याचा निर्धार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. बारामती येथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अनेक ठिकाणी शोक सभांचे आयोजन करण्यात आले. बीड येथे झालेल्या शोकसभेत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आपण पवार कुटुंबीयांच्या निर्णयासोबत राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. बीड येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संदीप क्षीरसागर यांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते, असे म्हणताना क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. संदीप क्षीरसागर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी वेगळे झाले तेव्हा आम्ही साहेबांना म्हणत होतो की अजित दादांच्या हातात तुम्ही सूत्र द्या, आता देखील पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयासोबत आहोत. पवार कुटुंबाशिवाय आम्हाला काहीच दिसत नाही, असे क्षीरसागर म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या हालचाली सुरू अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला असून, पक्ष एकत्रीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय पवार कुटुंबीय लवकरच एकत्र बसून घेण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चांमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत संपूर्ण पवार कुटुंब या विषयावर सविस्तर विचारमंथन करणार असून, विलीनीकरणाबाबतचा अंतिम शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाच असेल, अशी माहिती समोर येत आहे. अजित पवार NCP एकीकरणासाठी सकारात्मक होते; जयंत पाटलांचा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र यावेत, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच एकीकरणाच्या मुद्द्यावर इतक्या ठाम शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर