ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अंतरवालीतील आश्वासनाची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा:विखे पाटलांची माहिती; आणखी सकारात्मक निर्णयांची ग्वाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना औद्यगिक विकास महामंडळा मध्ये नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतला आहे.अंतरवाली सराटी येथील आंदोलना दरम्यान दिलेल्या आश्वासनाची कार्यवाही या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि वेगवेगळ्या मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या विविध मागण्यामध्ये आंदोलकांच्या मृत वारसदारांना नौकरी देण्याच्या मागणीचा समावेश होता.सदर मागणीबाबत सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदाराची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. काही दिवसांंपुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते.उपोषण सोडते समयी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी औद्यगिक विकास महामंडळा मध्ये मृत व्यक्तीच्या वारसदारांना नौकरी देण्याची कार्यवाही तातडीने करणार असल्याचे सांगितले होते. मृत आंदोलकांच्या वारसांना परिहवन महामंडळा मध्ये समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते.मात्र काहीची अपेक्षा औद्यगिक विकास महामंडळ किंवा वीज वितरण कंपनी मध्ये आहे.त्यानूसार औद्यगिक विकास महामंडळात मृत व्यक्तींच्या वारसांना समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावर वेगाने झाली असून,औद्यगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औद्यगिक विकास महामंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी अचूक,योग्य शहनिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द अंतरवाली सराटी येथील आंदोलना दरम्यान संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार करीत आहे.मराठा समाजाच्या मागण्याबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापुर्वी सकारत्मक निर्णय झाले.भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहोत. – डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, अध्यक्ष,मराठा आरक्षण उपसमिती कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या वतीने कांदा प्रश्नावर करण्यात येत असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,विरोधी पक्षाचे ते काम आहे.केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण निर्णय झाले.कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारची आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर