ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

रोहित पवारांनी माझे नाव कुठे घेतले?:दादांशी भेट ठरलेलीच होती, फक्त 10 मिनिटं उशीर- तटकरे, भाजप अस्वस्थ का? NCP गप्प का- लवांडे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रोहित पवार यांनी माझे नाव कुठे घेतले ते सांगा मग मला उत्तर देता येईल, माझी नियोजित वेळ 5 वाजताची होती मी 5 वाजून 10 मिनिटांनी तिथे पोहोचलो आणि पावणेसात-7 वाजता तिथून निघालो. माझी भेट 3 दिवस आधीच ठरली होती कारण मी रायगड तर अजित पवार पुणे दौऱ्यावर होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, 2014 आणि 2019 पासूनच भाजपसोबत सत्तेत असावे ही अजितदादांची अधिकृत भूमिका होती. त्यानुसार शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूळ विचारधारेसह आमचा एनडीएतील सहभाग कायम आहे. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रिपदी निवड कोणत्याही दबावाखाली नसून पूर्णतः पक्षीय सहमतीनेच झाली आहे. ..ती दादांची भूमिका होती सुनील तटकरे म्हणाले की, 2014 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्तेत असावे, अशी अजित पवारांची स्पष्ट भूमिका होती. ती त्यांनी पक्षाच्या सर्व अंतर्गत बैठकींमध्ये मांडली होती. 2019 चा पहाटेचा शपथविधी हा त्याचाच भाग होता. तीन पक्षांच्या खिचडी सरकारपेक्षा दोन पक्षांचे (भाजप-राष्ट्रवादी) सरकार महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेईल. राष्ट्रवादीने आवाज उठवावा विकास लवांडे म्हणाले की, अजित पवारांचा हा अपघात नाही हे चित्र स्पष्ट होत असताना त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यावर गप्प का बसले आहेत? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजित पवार यांच्या पक्षाने हिंमत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे तो आवाज तुम्ही का उठवत नाही? भाजपला अस्वस्थ होण्याची गरज काय? असा सवाल ही त्यांनी केला आहे. ..तर आज राष्ट्रवादी एकत्र झाली असती अंकुश काकडे म्हणाले की, अजित पवार आम्हाला म्हणाले होते की फार ताणाताणी करु नका लवकरच आपण एकत्र होणार आहोत. विलीनीकरणाबाबत कुठे माशी शिंकली माहिती नाही. पण 12 तारखेलाच हे होणार होते. त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगितले होते की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर 7-8 तारखेला याबद्दल जाहीर बोलण्यात येणार होते. पण ती तारीख अजित पवारांना सोयीची नसल्याने 12 तारीख ठरली होती. आज जर दादा असते तर चांगला निर्णय झाला असता. भविष्यात काय होईल याबद्दल मला काही माहिती नाही. शरद पवार यांनी देखील ही तारीख सांगितली होती, त्यामुळे आपण सर्व जण या तारखेची वाट पाहत होतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर