ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

टाकळी जिवरग येथे अहिल्यादेवी‎होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण‎:अहिल्यादेवी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या मूर्तिमंत उदाहरण -आमदार अब्दुल सत्तार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | टाकळी जिवरग टाकळी जिवरग येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर या महिला सक्षमीकरण, लोककल्याणकारी प्रशासन, न्यायप्रियता आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रजेला केंद्रस्थानी ठेवून विकासाभिमुख आणि लोकहितकारी प्रशासन दिले. देशभरातील अनेक धार्मिक स्थळांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. ते पुढे म्हणाले की, जीवरग टाकळी येथे उभारण्यात आलेला हा अश्वारूढ पुतळा केवळ एक स्मारक नसून तो अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्य, कर्तृत्व, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुणांचे प्रतीक आहे. या स्मारकाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना इतिहासाची ओळख होईल तसेच राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि कर्तव्यनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. हे स्मारक टाकळी जिवरग गावाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, माजी नगरसेवक सुनील दुधे, परमेश्वर जीवरग, सुखदेव जीवरग, शिवानंद महाराज, बाळू दवंगे, गणपत मैद, मधुकर फुके, विठ्ठल लुटे, परमेश्वर भावले, रामेश्वर भावले, योगेश भावले, सुखदेव भावले, लक्ष्मण भावले, अशोक भावले,आप्पा फुके, जगन लुटे, अण्णा जीवरग, सुभाष लुटे, देविदास फुके, दत्ता फुके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर