ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

श्रीकृष्ण- सुदामा भेटीने माहेश्वरी भवनाच्या भागवत कथेचे समापन:भागवताचे चिंतन हीच जीवनाची फलश्रुती: पू. राजेशकृष्ण

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुराणात भागवत हे श्रेष्ठ पुराण असून, यात सदा भगवान श्रीकृष्ण विराजमान असतात.अश्या भागवतचे सदा चिंतन करून भगवंताची प्राप्ती करावी असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे आयोजित भागवत कथेत बोलत होते. भागवतकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची भक्तीभावात पूर्णाहुती ने सांगता झाली.यात त्यांनी सुखी जीवनाचे रहस्य सांगून सुदामा चरित्र कथन करुन या सात दिवसीय भागवत कथेची सांगता केली. या भागवत कथेत पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी कुंती चरित्र, सुखदेव परीक्षित मिलन, प्रल्हाद चरित्र, वामन अवतार, राम जन्म, कृष्णजन्म, कृष्ण बाललीला, महारास,उद्धव गोपी संवाद,रुक्मिणी विवाह व सुदामा चरित्र आदी कथन करण्यात आले. तसेच विहंगम झाक्या सादर करण्यात आल्यात. संचालन मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती आरती जाजू यांनी व आभार मंडळाच्या सचिव सौ शोभा बियाणी यांनी मानलेत.यावेळी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भक्तानी लाभ घेतला. उत्सवाच्या सफलतेसाठी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनिता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक समवेत महिला मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. समारोपीय सोहळ्यात श्रीकृष्ण सुदामा भेटीची भजने समारोपीय सत्रात यावेळी श्रीकृष्ण सुदामा भेटीची भजने सादर करून जल्लोष साजरा करण्यात आला. महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ वंदना हेडा यांनी करून या कथा उत्सवाची सांगोपांग माहिती दिली. कथास्थळी पूर्णाहुती निमित्ताने होम हवन करण्यात आले. यात कथेचे मुख्य यजमान मीना उमेश टावरी, कृष्णा किशोर लाहोटी,पोथी यजमान लीला रमेश मालपाणी, अनुराधा आशीष बाहेती, अनुसया कुंजीलाल जाजू, नितीशा पंकज कोठारी यांनी आहुती दिली. या सप्ताहात ६ दिवस भोजन प्रसादी जाजू परिवारच्या स्व. ब्रजलता जाजू यांच्या स्मृतिीत देण्यात आले. या उत्सवात उद्योजक निखिलेश मालपानी, ध्वनी शिल्पी, सुरेश राठी, गणेश, गोविंद, ठाकुर,शोभाबाई,सुनीता , गजानंद, गोपाल,श्रीराम भैया, गोपाल सोमाणी आदींनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर