ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मध्यमवर्गाची आत्ममग्नता चिंताजनक:प्रा. मिलिंद जोशी यांचे मत; अण्णा तळवलकर ट्रस्टतर्फे पुरस्कार वितरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आंदोलने आणि चळवळी उभ्या करणारा, स्वतःच्या हक्कांसाठी लढणारा मध्यमवर्ग आता स्वतःच्या कोशात जगू लागला आहे. यामुळे संस्थात्मक कार्यासाठी आणि चळवळींसाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा ठप्प झाला असून, मध्यमवर्गाची ही आत्ममग्नता चिंताजनक आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. कै. कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित १९ व्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सोहम ट्रस्टच्या माध्यमातून भिकाऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरणारे डॉ. अभिजित सोनावणे यांना ‘समाजशिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, पॅकेजिंग मशिन्सच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘इंटेरपॅक मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड’ चे संचालक हिमांशू इंगळे यांना ‘अनुकरणीय उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. मनीषा सोनावणे आणि हिमांशू इंगळे उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह आणि ४० हजार रुपये असे आहे. प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, जागतिकीकरणानंतर कर्जाच्या रूपाने आर्थिक समृद्धी आली असली तरी, समाजाचा मूल्यविवेक हरवल्यामुळे चंगळवाद वाढला आणि संवेदनशीलता कमी झाली. पूर्वी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते, पण आज ते राहिलेले नाहीत. अन्नामुळे कुपोषित झालेला समाज जसा अपेक्षित नाही, तसाच स्वत्व आणि सत्व हरवल्यामुळे भावनिक दृष्ट्या कुपोषित होत चाललेला असंवेदनशील समाजही अपेक्षित नाही. एकीकडे भौतिक संपन्नतेचा भास निर्माण केला जात असला तरी, दुसरीकडे किळसवाणे वैचारिक दारिद्र्य आहे. समाजातील उच्चभ्रू वर्गाला स्वतःच्या प्रतिष्ठेच्या कल्पना जपण्यात अधिक रस आहे, त्यांच्या दुष्कृत्यांनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. समाजाचा आर्थिक दृष्ट्या जो खालचा स्तर आहे, त्याची लढाई जगण्याशी आहे, तर मध्यमवर्ग आत्मतुष्ट आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी असे चित्र अपेक्षित असताना, माणसांची गर्दी असे चित्र दिसते, असेही जोशी यांनी नमूद केले. याची कारणे मानसशास्त्रात सापडणार नाहीत, तर ती समाज व्यवहारात शोधावी लागतील. सामाजिक कार्यासाठी वेळ द्यावा लागतो, पण सध्या वेळेच्या बदल्यात किती पैसे मिळतील याचे गणित मांडले जाते. या मानसिकतेमुळे संस्थात्मक कार्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर