ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

NEET परिक्षेच्या पार्श्वभुमीवर रेल्वे गाड्यांना सर्वसाधारण डब्बे जोडण्याचा निर्णय:विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात नीट परिक्षा तसेच प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त सर्वसाधारण डब्बा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे. राज्यात रविवारी ता. २१ नीट परिक्षा होणार आहे. यापरिक्षेसाठी आपापल्या परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागणार आहे. काही ठिकाणी स्थानिक परिक्षा केंद्रावर तर काही भागात बाहेर जिल्हयात जाऊन विद्यार्थ्यांना परिक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यां सोबतच त्यांचे पालक देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारपासून रेल्वेगाड्यांना गर्दी राहणार आहे. या परिक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूकीची सोय व्हावी यासाठी नांदेड विभागाने रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडण्याचा निर्णय घेतलाआहे. यामध्ये गाडी क्रमांक ५७६५१ हुजूरसाहिब नांदेड ते मनमाड रेल्वेला ता. २० जून रोजी, तसेच परतीच्या प्रवासात ता. २१ जून रोजी एक डब्बा जोडला जाईल. तसेच गाडी क्रमांक ५७६५३ पूर्णा ते अदिलाबाद रेल्वेला ता. २० जून व ता २१ जून रोजी, गाडी क्रमांक ५७६५४ आदिलाबाद ते परळी गाडीला ता. २१ जून व ता. २२ जून, गाडी क्रमांक ५७६५५ परळी वैजनाथ ते अकोला या रेल्वेला ता. २१ जून व ता. २२ जून, गाडी क्रमांक ५७६५६ अकाेला ते पूर्णा रेल्वेला ता. २२ जून व ता. २३ जून रोजी अतिरिक्त डब्बा जोडला जाणार आहे. विद्यार्थ्यांसह प्रवाशांना सुरक्षित सुलभ व आरामदायी प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर