ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुरवठा न सुधारल्यास महावितरणला टाळे:सांगोल्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालक चिंतेत आहेत. आठ दिवसात तालुक्यातील भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून महावितरणच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात जाणवणाऱ्या दैनंदिन समस्या याबाबत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, सभापती पूनम इंगवले यांच्यासह तानाजी पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, नगरसेवक गणेश बनकर यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले मात्र, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने टेंभूचे पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासू लागली आहे. कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कामाला लागावे. भविष्यकाळाच्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीवर आपली सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सोयीस्कर भूमिका घ्यावी. राजकारणाच्या पुढील काळात कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तोच निर्णय घेतला जाईल,” असा विश्वास त्यांनी दिला. येणाऱ्या सोमवारी सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला सोमवारी लेखी निवेदन देऊन भारनियमन कमी करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात येईल. तरीही, भारनियमन कमी न झाल्यास मात्र कार्यकर्त्यांना घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येतील असे या आढावा बैठकीत सर्वानुमते ठरले. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड म्हणाल्या की, तालुक्यात विजेचा, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे. कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. जनतेच्या अडचणी सोडवा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर