ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

शिवकालीन युद्धकला, सांकेतिक भाषेचे कंवर नगरात तरुणांना धडे:शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित मर्दानी खेळ शिबिराचा उत्साहात समारोप‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे १५ मे ते ३१ मे या कालावधीत आयोजित मर्दानी खेळ व स्व-संरक्षण शिबिराचा समारोप ३१ मे रोजी स्थानिक मनपा शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर नगर, येथे उत्साहात झाला. या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रताप अडसड उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती महानगर सहकार्यवाह अंकुश उमक उपस्थित होते. समारोपिय कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन, शस्त्रपूजन व मशाल प्रज्वलित करून झाली. शिबिराचे प्रास्ताविक संयोजिका अनुराधा पांडे यांनी करत असतांना त्यांनी त्यात संपूर्ण पंधरा दिवसाचा आढावा मांडला. त्यांनतर सर्व शिक्षार्थ्यांनी १५ दिवसात शिकलेल्या सर्व शस्त्रकलांचे सादरीकरण केले. त्यामधे प्रामुख्याने तलवार, दंडपट्टा, दंडयुद्ध, लाठिकाठी, मुदगल, कराटे , कुऱ्हाड, भाला, जळती बनेटी या सर्व प्रत्यक्षिकांचा समावेश होता तर प्रात्यक्षिक चालू असतांना सर्व युद्धकलांची व शास्त्रांची माहिती विवेक धर्माळे यांनी सांगितली. या वेळी १३० विद्यार्थ्यांनी हे विविध प्रात्येक्षिक उत्तम रित्या सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.अडसड यांनी मार्गदर्शन करतांना या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व शिक्षकांना व शिक्षार्थ्यांना शिबिराच्या उत्तम आयोजना बद्दल शुभेच्छा दिल्या. पारंपरिक शस्त्र, खेळ किती गरजेचे आहे, तसेच शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेश रहाटगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंभू शौर्य मर्दानी आखाड्याचे संयोजक गौरव केणे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंभू शौर्य मर्दानी आखाड्याचे संयोजक गौरव केणे , संयोजिका अनुराधा पांडे, जयेशी वाढाई, भूषण खेडकर, जय पांडे, अथर्व बुरंगे, स्वराज ठाकरे, इशान गीद, रेणुका देशपांडे, प्रयागराज लोमटे, सृष्टी महाजन, दिव्यांका भुसाटे, आशिष मुळे, ऋत्विका देशमुख, महेश रहाटगांवकर, विवेक धर्माळे, सुशांत बल्लाळ, वंश कोठार, अथर्व पहाडे, रक्षित खाणीवाले, अथर्व डबली, रोहित नवले, अजिंक्य देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, ओम आष्टीकर, दर्शना राठी, कृपा पाटील, अविरत जोशी, सार्थक महानकर यांचा समावेश होता. प्रात्याक्षिक बघण्यासाठी शहरातील नागरिक व पालक वृंद उपस्थित होते. शिवकालीन गुप्तहेर विभागाची सांकेतिक भाषा असलेल्या करपल्लवीचे प्रात्यक्षिक हे सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक व त्यांचे गुप्तहेर हे लांबून हाताच्या बोटांद्वारे काही संकेत द्यायचे. यात नाव, गावासह काही गुप्त संकेत व माहितीही असायची. ती माहिती केवळ गुप्तहेर खात्यालाच माहिती असायची. त्यामुळे शत्रूला नेमके काय सुरू आहे, याबाबत काहीच कळायचे नाही. त्यामुळे गुप्तहेर खात्याचे कार्य अगदी विना अडथळा व्हायचे. ही करपल्लवी अजुनही सांकेतिक भाषा म्हणून वापरले जाते. याचे या शिबिरात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर